Monday, 30 January 2012

विरह" म्हणजे

ओढ" म्हणजे काय ते
जीव लावल्याशिवाय समजत नाही.

"विरह" म्हणजे काय ते
प्रेमात पडल्याशिवाय समजत नाही.

"प्रेम" म्हणजे काय ते
स्वत: केल्याशिवाय समजत नाही

"पराजय" म्हणजे काय ते
शत्रु कडुन हारल्याशिवाय समजत नाही

"दु:ख" म्हणजे काय ते
अपेक्षाभंग झाल्याशिवाय समजत नाही.

“सुख" म्हणजे काय ते
स्वत: मध्ये शोधल्या शिवाय मिळत नाही

{प्रत्येक अश्रूचा अर्थ दुखं होत नाही,
विरहाने कधी प्रेम कमी होत नाही,
वेळी अवेळी होतात डोळे ओले ,
कारण.....

आठवणी कधी सांगून येत नाहीत.

No comments:

Post a Comment