उभा होतो मळयात, नजर गेली खळयात
नवरत्नांचा हार ---------- च्या गळयात
नाशिकची द्राक्षे, नागपुरची संत्री
---------- आज पासुन माझी ग्रुहमंत्री
ताजमहल बांधायला कारागीर होते कुशल
-------- चे नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल
क्रुष्णाच्या बासरीचा राधेला लागला ध्यास
-------- देतो मी लाडवाचा घास
गंगेची वाळू चाळ्णीने चाळू
चलचल -------- आपण सारीपाट खेळू
मातीच्या चुली घालतात घरोघर
-------- झालीस माझी आता चल बरोबर
इतिहासाच्या पुस्तकाला भुगोलाचे कव्हर,
.....चे नाव घेते ....ची लव्हर.
समुद्राच्या काठावर मऊ मऊ वाळू
..........राव दिसतात साधे पण आतून चालू.
गणपतरावांबरोबर चित्रपट पाहिला त्याचे नाव सायको,
वामनरावांचे नाव घेते चिमनरावांची बायको.
चांदीच्या ताटात शिळ्या भाकरीचे तुकडे,
घास भरवते मरतुकड्या थोबाड कर इकडे.
मितालि बिल्डींग, तिसरा मजला, घर न - ११, घराला लावलि घंटी,
वर्षा माझी बबली आणि मी तिचा बंटी
मोबाईल वर एफ़ एम् एकते कानात हेडफोन टाकुन ......
मोबाईल वर एफ़ एम् एकते कानात हेडफोन टाकुन ......
आणि ....... रावना मिस कॉल देते एक रूपया बैलेंस राखून..
इराण्याच्या चहा बरोबर मिळतो मस्का पाव
**** रावांची बाहेर किती लफडी ते विचारू नका राव !!
1. सत्य पृथ्वीचा आधार,सुर्य स्वर्गाचा आधार
यन्य देवतांचा आधार........ राव
माझे आधार
2. आकाशाच्या अंगणात. ब्रम्ह .विष्णू आणि महेश
......... रावांचे नाव घेऊन करते हो
गृहप्रवेश
3. पित्याचे कर्तव्य संपले. कर्तव्याला माझ्या सुरुवात .......
रावांचे सहकार्य लाभो.माझ्या या भावी जीवणात
4. आकाशात चमकतो तारा. अंगठीत चमकतो हिरा
.......... रावांच्या जीवनात मंगळसूत्र हाच दागिना खरा
5. सोन्याची घागर अमृताने भरावी,
......... रावांची सेवा जन्मभर करावी.
7:-चंद्राच्या महालात रोहीणी ची चाहूल ,
.........रावांच्या जीवनात टाकते पहिले पाऊल .
8 पती पत्नी असतात सुख दु:खाचे साथी,
......... रावांचे नाव घेते आर्शिवाद असु दयावा माथी
6 उगवला सुर्य मावळती रजनी
......... चे नाव सर्देव माझ्या मनी
१) कण्वमुनींच्या आश्रमात शकुंतलेचे माहेर …… रावांनी दिला मला सौभाग्याचा आहेर.
२) प्रेमरूपी कादंबरी प्रेमाने वाचते ……. रावांच्या जीवनातील फुले आनंदाने वेचते.
३) नदीच्या काठी कृष्ण वाजीवतो बासरी ……. रावांच्या जीवावर मी आहे सुखी सासरी .
४) सत्यवानाच्या सुटकेसाठी सावित्रीने केला यमाचा पिच्छा …… रावांची सेवा घडो हीच माझी इच्छा.
५) चमकती बिजली निलवाणी आकाशात …….. रावांचे नाव घेते सौभाग्याच्या प्रकाशात.
६) मंगलअष्टका झाल्या,अंतरपाट झाला दूर …….. रावांची सौभाग्यवती झाले सांगतात सनईचे सूर.
७) नदीकाठी ताजमहालाची सावली ……. रावांना जन्म देणारी धन्य ती माउली.
८) इंग्लिशमध्ये चंद्राला म्हणतात मून ……… ची मी आहे …….. ची सून.
९) सुवर्णाची अंगठी,रुप्याचे पैंजण …….. चे नाव घेते ऐका सारेजण.
१०) उगवला चंद्र मावळला शशी …….. चे नाव घेते हळदी-कुंकवाच्या दिवशी.
११) मला नको हिरे,माणके, नको आकाशातील तारे ……… हेच माझे अलंकार खरे.
१२) भावंडांचा सहवास, आई वडिलांचा आशीर्वाद ………. रावांचे नाव घेताना तुमचेही लाभो आशीर्वाद.
संपात संप गिरणीचा संप
मारोतरावांच्या हातात ढेकणाचा पंप
गुलाबाच्या कळीला बकुळीचा वास
हणमंतराव बनले माझ्या आयुष्याचा त्रास
कुत्र्यात कुत्रं अल्सेशियन कुत्रं
जांबुवंतरावांनी गळ्यात बांधलं मंगळसूत्र
तळ्यातल्या चिखलात कमळ उमलले
भुजंगराव पडले त्यांना दुसऱ्याने काढले
१.
बुलढाण्याला जातांना लागतो अजिंठयाचा घाट
x x x रावांचा आहे पाटलांसारखा थाट.
२.
कपाशीचं शेत बोंडांनीं फुललं, भिरभिर नजर टाकतांना
x x x पाटील खुललं.
३.
जवारीचं पीक मोत्यांचे दाणे, भरल्या शेतांतून चालले
x x x पाटील राणे.
४.
शेतीचे दागिने नांगर, ईळा, कोयता, मी रांधते बिगी बिगी
x x x पाटील खातो आयता.
५.
बुलढाण्याच्या घाटांतून मोटार चालली वळणानं लक्ष्मीसंगं
x x x बुवा गप्पा करतात ऐटीनं.
६.
विद्येचा अभिमान नसावा, स्वाभिमान देशाचा राखावा
x x x रावांसह करावी मी स्वदेशाची सेवा.
७.
कन्या होतें मी मातृगृहीं, स्नुषा होऊनी आले सासरीं
x x x राव पति मिळाले भाग्यवान मी ठरलें खरी.
८.
लालन पालन आजवरी मातेचं पांघरुण मायेचं
x x x पति मिळाले जीवन सौंगडी खरंच नशीब माझं भाग्याचं.
९.
ह्रुदयाची श्रीमंती, नीति, धर्म न त्यजीन कधीं
x x x रावांचे लाभो सहकार्य विनंती थोरपदीं.
१०.
कुणाची करुं नये निंदा, कुणाचं काढूं नये वर्म,
x x x रावांच्या जीवावर हाच पाळीन धर्म.
११.
ऋण काढून सण करणं संसाराला दूषण
x x x रावांच्या सह मानानं जगणं हेंच आहे भूषण.
१२.
मानापानासाठी खोटेपणा नसावा
x x x रावांच्या पत्नीनं हाच नियम पाळावा.
१३.
धनदौलत मिळवतांना लाचलुचपत नसावी
x x x रावांची पत सर्व लोकांत असावी.
१४.
नोकरी असो, धंदा असो, नीतिमत्ता पाळावी
x x x रावांच्या सहवासात सुंदर तत्त्वें असावी.
१५.
यमुनेच्या तीरावर कृष्ण वाजवितो मुरली
x x x रावांच्या जिवावर सगळी हौस माझी पुरली.
१६.
देशांत देश हिंदुस्थान सरसा
x x x रावांना घास घालतें गोड अनारसा.
१७.
तूप वाढण्याला घेतें चांदीचा चमचा
x x x रावांना घास घालतें बुंदीच्या लाडूचा.
१८.
नागपूर माझें माहेर, नाशिक माझें गांव,
x x x रावांचें नांव घेतें शेवंती माझें नांव.
१९.
लावीत होते कुंकूं, त्यांत होतें मोतीं
x x x रावांसारखे भर्तार जन्मोजन्मीं चिंतीं.
२०.
चंदनाचे पाट त्यावे रुप्याचें ताट
x x x राव माझे भुकेले सोडा माझी वाट.
संग्रह २१ ते ४०
२१.
ठाण्याच्या डोंगरावर फुलला पळस
x x x रावांच्या छत्रीला सोन्याचा कळस.
२२.
झारी झारी पाउस लागे मोत्यांच्या धारा
x x x रावांच्या छत्रीला लावला पोवळ्यांचा तुरा.
२३.
मुंबईपासून पुण्यापर्यंत पेरला लसूण
x x x राव गेले रुसून तर आणतें त्यावर बसून.
२४.
दारीं होता कोंबडा त्यांत होता पैका
x x x रावांचं नांव घेतें सर्वजण ऐका.
२५.
आदघर मधघर मदघरांत घालीत होतें वेणी तिकडून आले
x x x राव त्यांनीं फेकली गुलाबदाणी.
२६.
कांचेची फुलदाणी धक्क्यानें फुटली उठा उठा
x x x राव तुमची माझी शपथ सुटली.
२७.
आमच्या मागच्या दारीं आहे द्राक्षांचा वेल
x x x राव बसले पुजेला मी देतें बेल.
२८.
आदघर मदघर, मदघरांत होती चूल चुलीवर होता तवा, त्यावर भाजला रवा
मी जातें माहेराला सासूबाई तुमी
x x x रावांना जीव लावा.
२९.
पुणेरी तांगा, मद्रासी घोडें,
x x x रावांचे नांव घेतें सत्यनारायणाच्या पुढें.
३०.
हुंडयावर गुंडा, गुंडयावर परात
x x x राव बसले पुजेला तिकडून जा घरांत.
३१.
रामासारखे पुत्र जन्मले कौसल्येच्या कुशीं
x x x रावांचे नांव घेतें आनंदाच्या दिवशीं.
३२.
तुळशीला घालतें प्रदक्षिणा, विष्णूला करतें नवस
x x x रावांचें नांव घेतें आज आनंदाचा दिवस.
३३.
जाई जुईच्या फुलांची माळी गुंफितो जाळी
x x x रावांचें नांव घेतें संध्याकाळच्या वेळीं.
३४.
दारापुढें ओटा, ऒटयावर लावली तुळस
x x x रावांच्या घरीं होईल संसार सुखाचा कळस.
३५.
करंज्या, पुर्यांनीं भरला रुखवत
x x x रावांनी माझा हात धरला सर्वांच्या देखत.
३६.
उभी होतें माडीला ऊन लागलें साडीला चांदीचीं घुंगरं
x x x रावांच्या गाडीला.
३७.
वाण घेतां घेतां माथ्यावर आलं ऊन
x x x रावांना सांगतें राहावं जपून.
३८.
इकडून डोंगर, तिकडून डोंगर, मध्यें भालू कुत्रं भुंकतं
x x x रावांना पाहून माझं डोकं उठतं.
३९.
बैठकीच्या खोलींत चांदीचा गल्लास
x x x रावांच्या जीवासाठी मी आपला जीव केला खल्लास.
४०.
कांचेचं घंगाळ, गुलाबाचं पाणी,
x x x रावांचं नांव घेतें मोहनराणी.
संग्रह ४१ ते ६०
४१.
कांचेच्या ग्लासांत गुलाबी सरबत
x x x रावांच्या वाचून मला नाहीं करमत.
४२.
मसाल्याची सुपारी चांदीच्या वाटींत
x x x रावांना ठेवीन म्हणतें मी माझ्याच मुठींत.
४३.
शुक्राची चांदणी उगवली ढगांत, जाऊ द्या मला घरीं
x x x राव आहेत रागांत भारी.
४४.
उगवला सूर्यंदेव, जगाचा राजा
x x x रावांचं नांव घेतें पहिला नंबर माझा.
४५.
सोन्याच्या कर्णफुलांना मोत्यांचे झुबे
x x x रावांची वाट पहात सारें गांव राहिलें उभें.
४६.
कांचेची तसबीर धक्क्यानें फुटली
x x x रावांच्या करतां मोटार बोदवडची सुटली.
४७.
साखरेची करंजी लाल झाली सपीटा सारणानें
x x x रावांचे नांव घेतें संक्राती कारणानें.
४८.
राजवरकी बांगडी मोल करी किंमतीनें
x x x रावांच्या राज्यांत दिवस जातो गंमतीनें.
४९.
वर्तमानपत्रांत लिहून आली वार्ता
x x x रावांचें नांव घेतें तुमच्या म्हणण्याकरितां.
५०.
पौर्णिमेच्या दिवशी चंद्र होता ढगांत
x x x रावांची कीर्ती पसरली जगांत.
५१.
चतुर्थीच्या दिवशीं मी निवडतें दुर्वा
x x x रावांच्या जिवावर शालू नेसतें हिरवा.
५२.
पूजेच्या साहित्यांत उदबत्यांचा पुडा
x x x रावांच्या जिवावर भरतें हातभर चुडा.
५३.
काळ्या चंद्रकळेवर तार्यासारख्या टिकल्या
x x x रावांच्या मळयांत खूप तुरी पिकल्या
५४.
काळ्या चंद्रकळेवर नक्षत्रासारखे ठिपके
x x x रावांच्या हातांत गुलाबाचे झुबके.
५५.
गाईच्या शिंगाना लावला सोनेरी रंग,
x x x राव बसले कामाला कीं, होतात त्यांतच दंग.
५६
गाण्याच्या मैफलींत पेटीचा सूर,
x x x रावांच्या भेटीसाठी जनलोकांचा पूर.
५७.
आईन वाढवल , वडिलांनी पढवलं ,
x x x रावांची होतांच सोन्यानं मढवलं.
५८.
दारापुढं वृंदावन त्यांत तुळशीचं झाड,
x x x रावांच्या गुणापुढं दागिन्यांचा काय पाड.
५९.
करवतकांठी धोतर आणि डोक्याला पगडी
x x x रावांची स्वारी पहिलवानासारखी तगडी.
६०.
वैशाखाच्या महिन्यांत उन्हाळ्याचा जोर
x xx घराण्यात राव पुरुष थोर.
६१.
श्रावणाच्या महिन्यांत जिकडे तिकडे पाणी
x x x रावांच्या भेटीसाठी मी झाले आतुर चातकपक्षावाणी.
६२.
नांवामध्ये आहे काय, नका हट्ट धरुं
x x x रावांच्या नांवाचा उखाणा चांगलासा जूळत नाही त्याला मी काय करुं ?
६३.
घरोघरी त्याचपरी, कोणाला सांगायच काय
x x x रावांच्या आज्ञेशिवाय पुढे टाकत नाही पाय.
६४.
सोन्याच्या घागरी गुलालांनी घासल्या
x x x रावांच नांव घेतां सख्या सगळ्या हंसल्या
६५.
नको गोट पाटल्या , नको पिळाची सरी
x x x रावांच्या जीवावर काळी गळसुरी बरी.
६६.
कौलारु घर त्याला मुरुमाची भर, अंबीरशाही फेटा ,नारळी पदर
x x x रावांच्या चेहर्याकडे पाहतांना थांबत नाही नजर.
६७.
कल्चर मोत्याला सुईसारखे वेज
x x x रावांच्या चेहर्यावर सूर्यासारखं तेज.
६८.
साजूक तुपांत नाजूक चमचा
x x x रावांचं नांव घेते आशीर्वाद तुमचा
६९.
दशक नको, सुट्टे नको , अंक मोजा साठ
x x x रावांचं नांव घेऊन बांधते आठवणीची गांठ .
७०.
सोन्याची सुपली मोत्यानं गुंफली
x x x रावांची राणी कामाला गुंतली.
७१.
निसर्गाच्या अंतरंगात पावित्र्याचा सुवास
x x x रावांच्या जोडीनं करीन आयुष्याचा प्रवास.
७२.
लता डोले, फूल डोले, डोले वनश्री
x x x रावांचं नांव घेतें x x x भाग्यश्री.
७३.
लक्ष्मी शोभते दानानं, विद्या शोभते विनयानं
x x x च्या जीवावर मी राहतें मानानं.
७४.
यमुनेच्या तीरावर कृष्ण वाजवतो पावा, बाळानं उजळला
x x x रावांच्या वंशाचा दिवा.
७५.
जीवनाच्या प्रवासांत कधीं दुःखाचं ऊन्ह तर कधी सुखाचा पाऊस
x x x रावांचं नांव घेतें सासूबाईनीं केली मंगळागौरीची हौस.
७६.
कमळांत उभी लक्ष्मी, मोरावरची सरस्वति
x x x रावांचं नांव घेतें
x x x भाग्यवती.
७७.
भारतमातेच्या पूजेला स्वदेशप्रेमाची पत्री
x x x रावांचं नांव घेतें मंगळागौरीच्या रात्रीं.
७८.
गंगा यमुना सरस्वति येऊन मिळाल्या थेट, संसाराच्या सारीपाटावर
x x x न् x x x ची झाली भेट.
७९.
संसाररुपी सागरांत उसळल्या लाटा
x x x रावांच्या सुखदुःखांतमाझा अर्धा वाटा.
८०.
पाण्याचे हंडयावर फुलांचे झांकण
x x x रावाचे हातांत सोन्याचें कांकण.
१०१.
तुळशीची करतें पूजा विष्णूची करतें शांति
x x x राव दीर्घायु व्हावेत अशी माझी विनंति.
१०२.
मथुरेच्या कुंजवनांत कृष्ण वाजवितो बासरी
x x x रावांच्या जिवावर सुखी आहे मी सासरीं.
१०३.
मंद वाहे वारा, चंद्र्भागेंत स्थिर चाले होडी
x x x रावांची व माझी सुखी आहे जोडी.
१०४.
जन्म दिला मातेनं, पालन केलें पित्यानं
x x x रावांचं नांव घेतें पत्नी या नात्यानं.
१०५.
हिंदमातेच्या हातांत रत्नजडावाचे तोडे
x x x रावांचं नांव घेतें वडील माणसांच्या पुढें.
१०६.
जाईजुईच्या झाडाखालीं फुलांचा विणला शेला
x x x रावांचं नांव घेतें दिवस अस्ताला गेला.
१०७.
लक्ष प्रदक्षणा घालतें उंबराला
x x x रावांचं नांव घेतें पहिल्या नंबराला.
१०८.
नऊ दिवस नवरात्र, दहाव्या दिवशीं दसरा
x x x रावांचं नांव घ्यायला नंबर माझा दुसरा.
१०९.
शंकराच्या पिंडीवर बेलाचें पान
x x x रावांचं नांव घेऊन राखतें तुमचा मान.
११०.
चांदीच्या ताटांत बर्फीची चवड
x x x रावांच्या नांवाची सर्वांना आवड.
१११.
संध्येच्या पळीवर नागाची खूण
x x x रावांचं नांव घेतें x x x सून.
११२.
हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी
x x x रावांचं नांव घेतें x x x दिवशीं.
११३.
रत्नजडीत सिंहासनावर उभा दत्तराज
x x x रावांचं नांव घेतें अखंड चुडा भरा आज.
११४.
प्राथमिक शाळेंत ज्ञानाची वाहते सरिता
x x x रावांचं नांव घेतें मैत्रिणींच्या आग्रहाकरितां.
११५.
रुणझुण जातें, खिडकीवाटे पाहतें, खिडकीला तीन तारा,
आडकित्त्याला घुंगरं बारा, पान खातें तेरा तेरा, घाम आला दरादरा
x x x राव बसले पलंगावर तर मी घालतें वारा.
११६.
रातराणीच्या सुगंधानं निशिगंध झाला मोहित
x x x रावांना आयुष्य मागतें सासुसासर्यासहित.
११७.
उभी होतें मळ्यांत, नजर गेली तळ्यांत, पांचशेंची कंठी
x x x रावांच्या गळ्यांत.
११८.
वेणीफणीच्या पेटीला बिलवरी आरसा
x x x रावांना घास घालतें अनारसा.
११९.
अनुसया, सीता, सावित्री होऊन गेल्या जगीं सती तीन
x x x रावांच्या चरणीं बाई मी असतें सदा लीन.
१२०.
गळ्यांत सरी वाकूं कशी, पायांत पैंजण चालूं कशी
x x x राव बसले मित्रापाशीं तर मोठयानं मी बोलूं कशी ?
संग्रह १२१ ते १४०
१२१.
पिकलेल्या पानांत बदाम घातले किसून
x x x रावांना विडा देतें पलंगावर बसून .
१२२.
चहा केला, चिवडा केला, कॉफी केली ताजी
x x x रावांचं नांव घेतें सर्वांची होती म्हणून मर्जी.
१२३.
मोठमोठया आकाराचे मोतीं वेचून काढले बारा
x x x रावांचे नांव घेतें माझं नांव तारा.
१२४.
सोन्याची बुगडी, मोत्यांचा कळस
x x x रावांचं नांव घेण्याला मला नाहीं आळस.
१२५.
आले राम सीता न् लक्ष्मण दीर,
x x x रावांचं नांव घेतें मंडळींनो व्हा स्थीर.
१२६.
काळ्या गाईचें लोणी, कड कड कढविलें,
x x x रावांचे महालांत कारंजें उडविलें.
१२७.
हापूस आंबा पायरी, त्याच्या केल्या फोडी,
x x x रावांच्या आंगठीवर राधाकृष्णाची जोडी.
१२८.
दारीं होती तुळस, तिला घालते पळी पळी पाणी, पहिली होती आईबापांची
तान्ही आतां झालें x x x रावांची राणी.
१२९.
मी होतें मळ्यांत, चंद्र दिसतो तळ्यांत
x x x रावांच्या नांवानें मंगळसूत्र बांधतें गळ्यांत.
१३०.
समुद्रात आली भरती, नदीला आला पूर
x x x रावांच्यासाठीं आईबाप केले दूर.
१३१.
गणपतीच्या डोक्यावर ठेवलें हिरेमाणकांचें छत्र
x x x रावांच्या नांवानें बांधतें मंगळसूत्र.
१३२.
सोळा वर्षांपर्यंत होतें माहेरच्या मायेंत
x x x रावंच्यासाठीं जाईन सासरच्या छायेंत.
१३३.
विद्येचा नसावा अभिमान, श्रीमंतीचा नसावा गर्व
x x x रावांचं नांव घेतें ऐकत आहेत सर्व.
१३४.
द्वारकेचा राजा, पाठीराखा द्रोपदीचा
x x x रावांना मी घांस देतें साखरभाताचा.
१३५.
आप्तांची भेट प्रेमाला येते भरती
x x x रावांची जोड हीच जीवनाची पूर्ती.
१३६.
स्वराज्याच्या बागेमध्यें गांधी झाले माळी
x x x रावांचं नांव घेतें वरातीचे वेळीं.
१३७.
वसंत ऋतूंमध्यें जशी येते कोकीळेची चाहूल तशीच मी टाकीतें
x x x रावांच्या घरामध्यें पाऊल.
१३८.
जिजाईनीं केला शिवादेवीला नवस,
आज x x x चा आला भाग्याचा दिवस.
१३९.
नमस्कार फुकाचा, आशिर्वाद मोलाचा
x x x रावांचा संसार करीन मी सुखाचा.
१४०.
श्रीकृष्णाची राधा, शंकराची पार्वती
x x x च्या जोडीला आशीर्वाद देती.
१४१.
गणपतीला दुर्वा, शंकराला बेल
x x x रावांच्या घरीं वाढेल वंशवृक्षाचा वेल.
१४२.
आंबाच्या वनांत कोकीळा करी कूजन
x x x रावांचें नांव घेतें झालें लक्ष्मीपूजन.
१४३.
माहेरच्या परिसरांत वेंचले मी ज्ञानकण
x x x रावांचें नांव घेऊन सोडतें मी गुंफलेलं कंकण.
१४४.
शंकराचा सोमवार, गणपतीची चतुर्थी, माझ्या ह्रुदयांत कोरली
x x x रावांची सुंदर मूर्ती.
१४५.
संसाररुपी सागरांत देहाची केली होडी
x x x रावांच्या घरांत शोभते x x x ची जोडी.
१४६.
भारतीय युद्धांत कृष्णांनीं सांगितली गीता
x x x रावांचं नांव घेतें मी x x x त्यांची कांता.
१४७.
मृग नक्षत्रांत आनंदानं नाच करतो मोर
x x x रावांच्या जिवावर लावीन कुंकवाची कोर.
१४८.
हिंदमातेच्या गळ्यांत स्वातंत्र्यफुलांची जाळी
x x x रावांचं नांव घेतें बारशाचे वेळीं.
१४९.
पेटी तबला शिकतां शिकतां वाजवली सतार
x x x रावांच्या संसारांत धन्य झालें मी फार.
१५०.
ज्योतिबा फुले यांनीं घेतला स्त्रीशिक्षणाचा कैवार
x x x रावांच्या घरीं मन रमवितो माझा संसार.
१५१.
नको मोतीं, नको चंद्रहार
x x x रावांचं नांव हाच माझा अलंकार.
१५२.
चंद्रोदयाला येती समुद्राला भरती
x x x रावांना बघून सारे श्रम हरपती.
१५३.
गोदावरी कांठची मुलगी कृष्णाकांठीं आली
x x x रावांच्या नांवाचं मंगळसूत्र ल्याली.
१५४.
चांदीच्या कढईंत कढविलं तूप
x x x रावांचं दिसतं त्यांत कृष्णासारखं रुप.
१५५.
वासांत वास घ्यावा केशराचा
x x x रावांच्या नांवाचा आग्रह आहे फुकाचा.
१५६.
आंब्याच्या झाडावर कोकिळा करितें कुंजन
x x x रावांच्या मूर्तीचें माझ्या अंतरीं चाले पूजन.
१५७.
पुण्यापासून मुंबईपर्यंत लावल्या आगगाडीच्या तारा
x x x रावांना मागतें औक्ष देवापाशीं शंभरावर सतरा.
१५८.
आंत जाते, बाहेर येतें, घडयाळ्यांत वाजला एक
x x x रावांचं नांव घेतें बाबरांची लेक.
१५९.
राधाकृष्णाची मूर्ति पहातें मी आरशांत
x x x रावांचं नांव घेतें घरच्या बारशांत.
१६०.
हिंदमातेच्या डोक्यावर मोत्यांची जाळी
x x x रावांचं नांव घेतें डोहाळजेवणाचे वेळीं.
१६१.
दया, क्षमा, शांति, हेंच सुखाचं माहेर
x x x रावांनी केला सौभाग्याचा आहेर.
१६२.
बिल्वर केले, पाटल्या केल्या, सरी आतां करावयाची
x x x रावांचं नांव घ्यायला मागं नाहीं सरायची.
१६३.
गोमंतकीय आंबा चवीला लागतो गोड
x x x रावांची मिळूं दे जन्मोजन्मीं जोड.
१६४.
चमकली रोहिणी हंसला रजनीनाथ
x x x रावांच्या जीवनांत माझी आहे साथ.
१६५.
सुशील सासू सासरे, सद्गुणी मातापिता
x x x रावांचं नांव घेतें सर्वांच्याकरितां.
१६६.
काव्यामध्यें श्रेष्ठ अलंकार आहेत उपमा उत्प्रेक्षा
x x x राव सुखी असोत हीच माझी अपेक्षा.
१६७.
चांगल्या कुळीं जन्मलें, चांगल्या कुळीं आलें
x x x रावांच्या मुळं भाग्यशाली झालें.
१६८.
सृष्टीच्या बागेंत सूर्यनारायण झाले माळी
x x x रावांचं नांव घेतें सर्वांच्या पंक्तीच्या वेळीं.
१६९.
घर भरावं लक्ष्मीनं, जग भरावं कीर्तीनं
x x x रावांच जीवन उजळीत मी रहावं प्रीतीच्या ज्योतीनं.
१७०.
काश्मीरशोभा पाहून थक्क झाले कवी
x x x रावांचं नांव घेतांना थबकला रवी.
१७१.
राम झाले विजयी सीतेला स्मरुन
x x x रावांचं नांव घेतें शांता-दुर्गेला स्मरुन.
१७२.
सोन्याच्या कामाला सोनार लागतो कुशल
x x x रावांचं नांव घेतें चांगलं अस्सल.
१७३.
चंदन कापूर कस्तुरी अत्तराचा वास
x x x रावांचं नांव घेतें तुमच्याचकरतां खास.
१७४.
संसाररुपी बागेंत प्रेमरुपी सरोवर, आयुष्याचा प्रवास करतें
x x x रावांच्या बरोबर.
१७५.
क्षत्रीय कुळीं जन्मलें भाग्य या कन्येचें
x x x रावांचं नांव झालें सार्थक या जन्माचें.
१७६.
सौभाग्याच्या साक्षीनं काळ्या मण्याची पोत आली जीवनांत
x x x रावांच्या असूं दे मी नित्य स्मरणांत.
१७७.
कण्वमुनीचा आश्रम शकुंतलेचं माहेर
x x x रावांनीं दिला मला सौभाग्याचा आहेर.
१७८.
केळीच्या पानावर गाईचं तूप
x x x रावांचं कृष्णासारखं रुप.
१७९.
सासू नी सासरे, जसा वाडयाचा कळस, नणंद अक्काबाई जशी दारींची तुळस,
x x x रावांचं नांव घ्यायला मला नाहीं आळस.
१८०.
निळें पाणी, निळे डोंगर, हिरवें हिरवें रान
x x x रावांचं नांव घेऊन, राखतें सर्वांचा मान.
१८१.
नीलवर्ण आकाशांत चमकतो शुक्राचा तारा
x x x रावांच्या सहवासांत मला लागतो सुखाचा वारा.
१८२.
काशीच्या तांब्याला रामेश्वराची खूण
x x x नांव घेतें x x x सून.
१८३.
गोट केले, पाटल्या केल्या, मध्यें लेतें केरवा
x x x रावांच्या जीवावर शालू नेसतें हिरवा.
१८४.
चंदनाच्या पाटाला रुप्याचे ठसे
x x x राव पाटावर बसे तर चंद्रसूर्य हंसे.
१८५.
गुलाबाचं फूल माळ्याच्या मळ्यांत
x x x रावांचं नांव घेतें सवाष्णींच्या मेळ्यांत.
१८६.
अंजिरी चोळीला मिर्यायेवढी गाठ
x x x रावांचं नांव घेतें हळदी कुंकवाचा थाट.
१८७.
काळी निळी घोडी मुंबईच्या बाजारीं
x x x रावांची खुर्ची वकिलाशेजारी.
१८८.
चांदीच्या ताटांत खडी साखरेचे काजू
x x x राव निघाले कचेरीला फौजदार देती बाजू.
१८९.
पैठणी नको, शालू नको, नको भरजरी शेला
x x x रावांच्या ह्रुदयांत जागा आहे मला.
१९०.
सहस्त्र कमळामध्यें वास आहे लक्ष्मीचा, मला आहे अभिमान
x x x रावांच्या नांवाचा.
२००.
अहमदाबादी चंद्रकळा, तिला मोत्यांचा पदर
x x x रावांच्या जिवावर हळदीकुंकवाचा गजर.
२०१.
रुप्याचा चौफुला त्याला लवंगा वेलदोडयांचा सांठा
x x x रावांच्या विडयांत माझा आहे वांटा.
२०२.
गंगेची वाळू चाळणीनं चाळूं, घरीं गेल्यावर
x x x राव आपण सारीपाट खेळूं.
२०३.
सोन्याच्या सोंगटया, रुप्याचे फांसे, जज्यांच्या कचेरींत
x x x राव खासे.
२०४.
वाटल्या डाळीचं केलं पिठलं, त्यांत खोबरं घातलं किसून
x x x राव गेले रुसून तेव्हां सावित्रीनं तें खाल्लं चाटून पुसून.
२०५.
कोर्या घागरींत ठेवला लिंबांचा सार
x x x रावांच्या राणीच्या गळ्यांत मोत्यांचा हार.
२०६.
रुप्याच्या ताटांत रायपुरी साखर
x x x रावांना भूक लागली आतां जाऊं द्या मला लवकर.
२०७.
पिवळ्या पितांबरामध्यें सोडले सोगे
x x x राव गणपतीच्या पुजेला उभे.
२०८.
रत्नखचित डबी, त्यांत मोत्यांचा दाणा
x x x रावांच्या स्वारीबरोबर सरस्वतीचा आला मेणा.
२०९.
प्रभातकाळीं निळ्या आभाळांत उगवतो सूर्यकांत, मनाचा लागत नाहीं थांग पण
x x x राव दिसतात शांत.
२१०.
कुरुंदाची सहाण, चंदनांचं खोड
x x x रावांचा शब्द अमृतापेक्षां गोड.
२११.
चंद्राची जशी चंद्रिका वशिष्ठांची अरुंधती तशीच मी आहें
x x x रावांची आवडती.
२१२.
पुण्यास जन्मलें, मुंबईस शिकलें
x x x रावांच्या जिवासाठीं नागपूर पाहिलें.
२१३.
घोडयावरला स्वार उंटावरला जोजला
x x x रावांचें नांव घेण्यास जाऊं द्या मला.
२१४.
पेशव्यांचे फौजेंत बिनीचे स्वार
x x x रावांचें नांव घेतलें उघडा आतां दार.
२१५.
पेशव्यांच्या फौजेंत हत्तीवर निशान
x x x राव मला चाहतात जीव की प्राण.
२१६.
चंदनी पलंग, चांदीचे खूर
x x x रावांचे नांव सर्वांना मशहूर.
२१७.
पूर्वदिशा फाकली, उदयास आला रवी, आमच्या कुलांत
x x x राव जन्मले कवी.
२१८.
दिल्लीचें सिंहासन पेशव्यांनीं फोडलें
x x x रावांच्या जिवाकरतां मी माहेर सोडलें.
२१९.
स्वतःचा धर्म परधर्माहून मानावा श्रेष्ठ
x x x रावांना मी ठेवीन सदा संतुष्ट.
२२०.
चांदीच्या ताटांत दहींभाताचा काला
x x x रावाचं नांव घेतें जयहिंद बोला.
२२१.
सागवानी टेबलावर रुमाल टाकतें विणून
x x x रावांचं नांव घेतें आग्रह केला म्हणून.
२२२.
विठोबाच्या शिखराला सोन्याचा कळस
x x x रावांचं नांव घ्यायला मला नाहीं आळस.
२२३.
चांदीच्या ताटांत सोन्याच्या गिन्न्या
x x x रावांचं नांव घेते पवारांची कन्या.
२२४.
सोन्याची आंगठी हिरव्या शालूंतून झळकली
x x x रावांची मूर्ति आगगाडींतून वळखली.
२२५.
मोठे मोठे मोतीं कानांतील कुडीला
x x x रावांचं नांव घेतें मैत्रीणींच्या जोडीला.
२२६.
आत्तांच्या राज्यांत बांगडया भरतें तीन तीन
x x x रावांच्या खमीसाला फौन्टपेन एकच यीयमीन.
२२७.
चांदीच्या ताटांत, वेलदोडे घातले भातांत,
x x x रावांची स्वारी निघाली कचेरीस, छत्री देतें हातांत.
२२८.
धाकटयानें राखावा वडिलांचा आदर
x x x रावांचं नांव घेतलें सोडा आतां पदर.
२२९.
सुनेस जशी सासू, तसा मुलांस पंतोजी
x x x रावांची झाली नाहीं कधीं मजवर नाराजी.
२३०.
चंदनाच्या झाडावरती देवी घेते विसावा
x x x रावांचें नांव घेतें आशीर्वाद असावा.
२३१.
साखरेच्या गाठया निरीच्या घोळ्यांत
x x x रावांचें नांव घेतें सुवासिनींच्या मेळ्यांत.
२३२.
माळ्याच्या मळ्यांत चालली होती मोट
x x x राव घ्या पाण्याचा घोट.
२३३.
गणेशचतुर्थीच्या दिवशीं गणपती केला शाडूचा
x x x राव घांस घ्या लाडूचा.
२३४.
द्राक्षाच्या वेलाला त्रिकोणी पान, मी हिंडलें हिंदुस्थान
x x x राव मिळाले ही रत्नाची खाण.
२३५.
चंदनाच्या झाडाखालीं नागिणीची वस्ती
x x x रावांचें नांव घेतें आग्रह झाला जास्ती.
२३६.
सोनेरी डबींत अत्तराचा बोळा
x x x रावांचं नांव घेतें शंभर रुपये तोळा.
२३७.
पंढरपूरचा चुडा, काशीचा विडा, मथुरेचीं पानं, खायला छान, चिमणा आंबा,
त्याच्या केल्या फोडी, आईबापांना गोडी, समोर होती तुळशीची बाग, बागेंत
होती सीता, तिच्याजवळ होती कळशी, कळशींत होतं गंगेचं पाणी
x x x रावांचं नांव घेतें पंचामृतावाणी.
२३८.
समोर होता कोनाडा, कोनाडयांत होती सरी, सरी गेली सरकून, नांव घेतें पारखून
x x x रावांच्या हाताखालीं पांचशें कारकून.
२३९.
काळ्या मण्यांची पोत हें सौभाग्याचं लेणं
x x x रावांच्या जिवावर x x x चं अवलंबून जिणं.
२४०.
चंदनाच्या झाडाला नागिणीचा वेढा
x x x रावांचं नांव घेतें माझी वाट सोडा.
२४१.
सौभाग्याचं लेणं, काळ्या मण्यांची पोत
x x x रावांच्या चरणीं अर्पण करते माझी जीवनज्योत.
२४२.
सासू सासरे भाग्याचे दीर माझे हौशी
x x x रावांचें नांव घेतें हळदी कुंकवाचे दिवशीं.
२४३.
मंगलदेवी मंगलमाते नमन करतें तुला
x x x रावांचं नांव घेतें अखंड सौभाग्य दे मला.
२४४.
आशिर्वाद लाखाचा, अहंकार फुकाचा
x x x रावांचा संसार करीन मी सुखाचा.
२४५.
सकाळच्या प्रहरीं नमन करतें दत्ताला
x x x रावांचं नांव घेतांना आनंद होतो चित्ताला.
२४६.
काशीसारखें शहर, प्रजेसारखा राजा
x x x रावांचं नांव घेतें केल्या पुण्यांत अर्धा हिस्सा माझा.
२४७.
रुक्मीणीनं पण केला कृष्णाला मी वरीन
x x x x x रावांचा संसार सुखाचा मी करीन.
२४८.
पांची पांडव सहावी द्रौपदी
x x x रावांसारखे मिळाले पति, तर देवाचे आभार मानूं किती.
२४९.
द्राक्षाच्या वेलाखाली चरत होत्या हरिणी
x x x रावांचं नांव घेतें वडिल मंडळींच्या चरणीं.
२५०.
जीवनरुपी सागरांत पतीपत्नींचा खेळ
x x x रावांचं नांव घेतें संध्याकाळची वेळ.
२५१.
मणी मंगळसूत्र हें माझें द्र्व्य
x x x रावांच्या आज्ञेंत रहाणें हेंच माझें कर्तव्य.
२५२.
देशांत देश हिंदुस्थान, जगामध्यें त्याचा मान
x x x रावांची कांता देशासाठीं करील दान.
२५३.
हत्तीवर अंबारी, उंटावर झारी
x x x रावांची आली स्वारी, तर पहातात नगरच्या नारी.
२५४.
संसाराच्या देव्हार्यांत नंदादीप समाधानाचा,
x x x रावांचा संसार करतें भाग्याचा.
२५५.
संसारुपी सागरांत पती-पत्नींची होडी, ईश्वरा सुखी ठेव
x x x रावांची नि माझी जोडी.
२५६.
यमुनेच्या तीरीं कृष्णदेव वाजवितो बांसरी,
x x x रावांच्या जिवावर मी आहें सुखी सासरीं.
२५७.
संसारामध्यें मुख्य असतात कनक आणि कांता,
x x x रावांना जन्म देणारी धन्य ती माता.
२५८.
चमकली शुक्राची चांदणी, चंद्र बुडाला ढगांत,
x x x राव पडले पदरांत तर सौभाग्यवती झालें जगांत.
२५९.
मानससरोवरांत रहातात राजहंस पक्षी,
x x x रावांचं नांव घेतें चंद्र सूर्य साक्षी.
२६०.
दोनशेचा शालू, त्याला तीनशेंचा पदर,
x x x रावांच्या नांवानं लेतें हळदी कुंकवाचा गजर.
२६१.
चांदीच्या ताटांत सोन्याची सरी,
x x x रावांचं नांव घेतें तुमच्या घरीं.
२६२.
शालूचा पदर अडकला तोडयांत,
x x x रावांचं घेतें तुमच्या वाडयांत.
२६३.
महादेवाच्या पिंडीला चौकोनी आरसे,
x x x राव बसले जेवायला, मी वाढतें अनारसे.
२६४.
जटाधारी शंकराची गौरवर्ण कांति,
x x x राव सुखी असोत हीच देवाजवळ विनंति.
२६५.
संगीत नाटक सुभद्राहरण,
x x x रावांच्या नांवाचं आज काय कारण ?
२६६.
दाट मणीमंगळसूत्र मोतीं लावा आणिक, आत्याबाईंच्या पोटीं
x x x राव जन्मले माणिक.
२६७.
आयाबाया म्हणतात, नांव घे नांव घे, लाजूं कशी नांव घ्याया ? मी तर
x x x रावांची जाया.
२६८.
हातामध्यें गोठ पाटल्या, सरी आहे करायची,
x x x रावांचं नांव घ्यायला मागें नाहीं सरायची.
२६९.
कृष्णाबाई नदी मध्यभागीं कमान,
x x x रावांची मूर्ती कृष्णदेवासमान.
२७०.
चांदीच्या भांडयाला नांवाची खूण,
x x x रावांचं नांव घेतें मोहित्यांची सून.
२७१.
चांदीच्या ताटांत दहिभाताचा काला,
x x x रावांचं नांव घ्यायला आजपासून आरंभ केला.
२७२.
चांदीच्या तबकांत मोत्यांचे गरे,
x x x राव दिसतात बरे, पण वागतील तेव्हां खरे.
२७३.
चांदीच्या वाटींत डाळिंबाचे दाणे,
x x x मोहित्यांच्या घराण्यांत शहाणे.
२७४.
तिपेडी वेणींत मोती गुंफले एक लाख,
x x x रावांचं नांव घेतें आशीर्वाद द्या लाख लाख.
२७५.
सोन्याची पाटली हाताला दाटली,
x x x रावांचं नांव घेतांना खुशाली वाटली.
२७६.
मोत्याचा करंडा, चांदी सोन्याचं झांकण,
x x x रावांचं नांव घेतें न् सोडतें कंकण.
२७७.
मागें घालते पाटल्या, मधें घालतें बिल्वर, पुढें घालते छंद,
x x x रावांचं नांव घेतें कल्ला करा बंद.
२७८.
शिणगारलेला हत्ती मांडवापुढें झुले,
x x x रावांच्या हातांत सुवासिक फुलें.
२७९.
भरल्या पंगतींत रांगोळी काढतें ठिपक्यांची,
x x x रावांच्या भोंवती पंगत पडली मित्रांची.
२८०.
शंकरासारखा पिता, गिरजेसारखी माता,
x x x रावांची मी आवडती कांता.
]
२८१.
गोकुळांत श्रीकृष्ण वाजवतो पावा,
x x x रावांचं नांव घेतें आशीर्वाद असावा.
२८२.
यमुनेच्या तीरीं कृष्ण क्रीडा करी,
x x x रावांचं नांव घेतें चव्हाणांच्या घरीं.
२८३.
बारीक बांगडी भरतें किंमतीनं,
x x x रावांच्या सहवासांत दिवस जातात गंमतीनं.
२८४.
मेनकेच्या पोटीं जन्मली शकुंतला,
x x x रावांचे गुण पाहून अर्पण केली मला.
२८५.
गणपती हरिश्चंद्र सुटला वारा, रास करा, गाडया भरा,
x x x राव तुम्ही पेवाला जागा करा.
२८६.
एक शेर दुधाचा पावशेर खवा,
x x x रावांचं नांव घेतें लक्षांत ठेवा.
२८७.
चंद्रभागेंत बुडवितें चांदीचा घडा,
x x x रावांनीं दिला मला सातारचा पेढा.
२८८.
अनारसे काढते तळून, लाडू ठेवते वळून, आईबापांच्या इथं राहिलें होतें खेळून
x x x x राव आतां घ्या संभाळून.
२८९.
चहा केला निवून गेला, पेरु देतें चिरुन, केळीची काढतें साल,
x x x रावांच्या जिवावर कुंकूं लेतें लाल.
२९०.
कांचेच्या बरणींत दुहेरी बर्फी,
x x x रावांचं नांव घेतें दुहीतर्फी.
३००.
उत्तरदाणी, गुलाबदाणी, चौफुला केला नवा,
x x x राव कोल्हापूरची दाखवा मला हवा.
३०१.
लहानपणीं तुळशीला घालीत होतें पळी पळी पाणी म्हणून आतां झालें
x x x रावांची राणी.
३०२.
काळी चंद्रकळा नेसतें कसून,
x x x रावांनीं दिलेले पेढे खातें हसून.
३०३.
काळी चंद्रकळा तिला कस्तुरी चांदणी,
x x x रावांचं नांव घेतें मोहित्यांची राणी.
३०४.
मागं पुढं गोठ पाटल्या, मधीं लेतें छंद,
x x x रावांचं नांव घेतें गलबला करा बंद.
३०५.
साताराच्या सडकेनं घोडयांची लाईन,
x x x रावांचं नांव घेतें भावांची बहीण.
३०६.
द्राक्षांच्या वेलीला त्रिकोणी पान, बाबा हिंडले हिंदुस्थान,
तेव्हां सांपडले x x x राव छान.
३०७.
भाग्य उजळलं पत्नीचं, अंगठीवर चमकला हिरा, आकाशांत चमकला तारा,
x x x रावांचं नांव घेतें हाच माझा भाग्योदय खरा.
३०८.
नव्या संसारांत स्त्री असावी हौशी,
x x x रावांचं नांव घेतें मंगलकार्या दिवशीं.
३०९.
एकादशीच्या दिवशीं विठ्ठलाला वहातात तुळशी,
x x x रावांचं नांव घेतें मंगळागौरीच्या दिवशीं.
३१०.
अंबाबाईच्या देवळांत सोन्याची आळी,
x x x रावांचं नांव घेतें संध्याकाळच्या वेळीं.
३११.
राम बसले रथांत, सीता बसली अंकावर,
x x x रावांचं तेज झळके माझ्या कुंकवावर.
३१२.
नीलवर्ण आकाशांत चमकतो शशी,
x x x रावांचं नांव घेतें संक्रांतीच्या दिवशीं.
३१३.
कनकाच्या कोंदणांत हिरकणी शोभते,
x x x रावांची नि माझी जोडी अशीच खुलून दिसते.
३१४.
सोन्याचं तबक झाकतें शालूच्या पदरानं, शीलवती मी
x x x रावांचं नांव घेतें विनयानं.
३१५.
शोधिली वसुंधरा प्रेमलुब्ध माता,
x x x रावांची मी सुशीला कांता
३१६.
उभारला ज्यांनीं उत्सव, मैत्रिणी माझ्या हौशी
x x x रावांचं नांव घेतें मंगल दिवशीं.
३१७.
अक्राळ विक्राळ वीर चमकते ढगात
.x x x रावांचं नाव घेते धन्य़ झालें मनांत
३१८
खोल्यांत खोल्या सात खोल्या , उघडून गेले आंत ,मधल्या खोलीत ताट
लाडवानं भरलं काठोकाठ , ताटाला केली खूण x x x रावांचे नांव घेते
x x x ची सून
३१९.
तुळशी तुळशी , तूं माझी काशी, वृंदावनी एकादशी,पाणी घालीन गंगेच,
विमान येईल महाविष्णूचे , विष्णू तूं गाता, जवळ होती रुक्मीणी माता,
तिन सांगितल्या दोन खुणा, आम्ही अज्ञान लेकरुं कृपा करुन चालवावी माय
भक्तीनं वाढ्वावे सन्मानाने दे सत्यनारायणा आशीर्वाद, तुला करते भक्तिचा नमस्कार.
३२०.
तुळ्शी तुळशी चंद्रभागा सुंदरी , तुझ्या उदकांत भिजली माझी निरी , हाती
ओल्या पडदिनीच्या निर्या उभी द्वारकेच्या दारी, भेटु दे गोकुळचा श्रीहरी.
३२१.
उत्तम ऋषी , गौतमऋषी, फुलं तोडते निशिगंधाची ,
न् भेट घेते x x x ची
३२२
सीतेला चालणं पडलं रामाच्या रथात ,सुखी राहीन
x x x मी रावांच्या संसारात.
३२३.
जिर साळीचा करते भात, येळ लवंगाची केली शाक, वनगाईचं पिवळं तूप,दारी
चंदनाचा पाट,चूळ भरावी नदीची , कृष्णाबाईचं तिरीथ, दारी दवबिन्याचं रोप,
चांदीच्या ताटाळ्यांत चिकनी सुपारी , कडुकांत जातें, बंदुला शेला पदर
पालवीतें, जा ग वहिनी उद्यां येते
x x x रावांच नांव तुमच्या देखत घेते.
३२४.
जरीचा पदूर अडकला तोड्यांत
x x x रावांच नांव घेते बाळातनीच्या वाड्यांत.
३२५.
चांदीच्या ताटांत केशरी बर्फी
x x x मालक निवडून आले आमच्या ग्रामपंचायती तर्फी.
३२६.
आपुल्या मुलुखांतच व्हायचा आपल्या भाषेचा मान
x x x रावांचा नांव घेते ऐका देऊन कान.
३२७.
उशाखालचा शेला पायाखाली गेला उठा उठा
x x x राव कासराभर दिवस आला.
३२८.
लावीत होतें कुंकू त्यांत पडलें मोती
x x x रावांसारखा भ्रतार जन्मोजन्मी चिंती.
३२९.
आधी घातला चंद्रहार मग घातली ठुशी
x x x रावांचं नांव घ्यायला नहेमींच माझी खुशी.
३३०.
एक पाय घरांत , एक पाय दारांत जडावाचं पदक
xx x रावांच्या हारांत.
३३१.
सागवानी पेटीला पोलादी चूक
x x x रावांच्या हातांत कायद्याचं बूक .
३३२.
शिसवी लाकडांचा देव्हारा त्यांत चांदीची मूर्ति,
x x x रावांची देशभक्त म्हणून जगभर कीर्ति .
३३३.
काळी चंद्र्कळा तिला मोतीचूर पदर
x x x रावांच्या जिवावर हळद कुंकवाचा गजर.
३३४.
चाकणच्या किल्ल्यावर ठेवल्या फौजा
x x x रावांच्या जिवावर मारतें मौजा.
३३५.
देवापुढं लावला ऊद, वास सुट्ला छान,
x x x रावांचं नांव घेते ऐका देऊन कान.
attractive piece of information, I had come to know about your blog from my friend arjun, ahmedabad,i have read atleast eleven posts of yours by now, and let me tell you, your website gives the best and the most interesting information. This is just the kind of information that i had been looking for, i'm already your rss reader now and i would regularly watch out for the new posts, once again hats off to you! Thanks a lot once again, Marathi ukhane
ReplyDeleteNice list of marathi ukhane -
ReplyDeleteukhane101
marathi ukhane for groom
marathi ukhane for male
marathi ukhane for female
marathi ukhane for bride