Friday 24 February 2012

खर प्रेम म्हणजे एकमेकांवरील विश्वास

खर प्रेम म्हणजे एकमेकांवरील विश्वास ज्याला कधीही तडा नाही गेला पाहिजे .एक आदर जो कधी कमी नाही झाला पाहिजे .एक सन्मान जो मरेपर्यंत नाव काढत राहणार आणि एक यातना म्हणजे एकमेकांसाठी तुटणारा जीव .थोडक्यात ह्या गोष्टी प्रेमात नाही तर ते प्रेम अधूर असत .पण वासना हे एक अस साधन आहे ते कि ते ह्या गोष्टीना वेगळ करत अर्थात वासना ही प्रेमाची मुळात भावनाच नाहीये हे फक्त एक अल्पशी गोष्ट आहे ज्याने आपणास नाव ठेवली जातात . ही माझी संकल्पना आहे प्रेम बद्दल .आणि या वासने मुळे मग लोक आपणास नाव ठेवतात मग प्रेमाबद्दलची जी आस असते ती कमी होते .आणि आपल्या समाज्यात असे काही गोष्टी आहेत किंवा लोक आहेत कि ते प्रेमाला एक वेगळी भावना समजतात .आणि आजची पिढी तुम्हासर्वांना तर माहितच आहे .आत्ताच जीवन हे खूप अवघड आहे .पण आपण जर खर प्रेम करत असेल तर आपण या गोष्टींकडे दुर्लक्ष करू शकतो फक्त दोन प्रेम करणार्यांचा एकमेकांवर विश्वास हवा .बस मग आपण हे युद्ध सहज जिंकू शकू .आणि खरच एकदा तरी प्रेम कराव आयुष्यात अगदी निरागसपणे.मग समजेल प्रेम म्हणजे काय असते ते...

No comments:

Post a Comment