Sunday, 14 October 2012


...कारणं जिव माझा तुझ्यात होता.
जेव्हां हात तुझा हातात होता
तुझ्यासगे लाबं चालत रहायची
आता घराच्या बाहेर पडत नाही
मन घाबरतं कुठेतरी हरवायची.
जेव्हां तुझा हात खाद्यांवर असायचा
मी त्याला आधार समजायची
आता उभी राहताच तोल जातो मझा
धडपडताना तेव्हां तुझा हात धरायची.
जेव्हां तु माझ्या जवळ होतास
तेव्हा सारी सुखं माझ्या जवळ होती
आता काटे विखरलेत अगंणात माझ्या
तेव्हां फ़ुल माझ्या दारात होती.
जेव्हां तु माझ्या काळजात होतास
तेव्हां आत्मा माझ्या मनात होता
आता मी इथे जिवंत प्रेत झालेय
कारणं जिव माझा तुझ्यात होता.

एक प्रेयसी पाहिजे......

एक प्रेयसी पाहिजे, पावसात चिंब भिजणारी;
अन मलाही तिच्यासोबत, भिजायला लावणारी.

एक प्रेयसी पाहिजे, फुलपाखरांमागे धावणारी;
फुलांचे सारे रंग उधळत, झाडांमागे लपणारी.

एक प्रेयसी पाहिजे, मुग्धपणे हसणारी;
माझ्या बाहूपाशात, अलगद येऊन बसणारी.

एक प्रेयसी पाहिजे, कशीही दिसणारी;
पण मनाने मात्र, अप्रतिम सुंदर असणारी.

एक प्रेयसी पाहिजे, जिवलग मैत्रीण असणारी;
आमच्या नाजुक नात्याला, हळुवारपणे जपणारी.

एक प्रेयसी पाहिजे, माझ्या भावना जाणणारी;
मी जसा आहे तसेच, माझ्यावर प्रेम करणारी.

एक प्रेयसी पाहीजे, प्रेमाला प्रेम समजणारी;
सुखा-दुःखात माझ्या, तन्मयतेने साथ देणारी.

एक प्रेयसी पाहीजे........ मिळेल का अशी?

Wednesday, 3 October 2012


न शिकवता शिकलो शिवानितीचे धडे !
उच्चार जर कराल शिवशब्दाचा तर मृत हृदयही धडधडे !
अपमान जर कराल राजांचा तर फाडून काढू खडे खडे !
शिवरायांच् या पुण्याईने मराठी पाऊल पडते पुढे !
"जय जिजाऊ"
"जय शिवराय"
"जय शंभुराय