Friday, 24 February 2012

नाते दोन जीवांचे, तुझे नि माझे

नाते दोन जीवांचे, तुझे नि माझे
दूर राहूनही अतूट राहते कसे ?

कधी आनंदाने सुचतात गाणी
कधी तुझी आठवण, डोळ्यात आणते पाणी
गाण्यातील सुर मग असे फुटतात कसे ?
नाते दोन जीवांचे, तुझे नि माझे
दूर राहूनही अतूट राहते कसे ?

कधी हसतेस, कधी रुसतेस, तर कधी रागवतेस
कधी रड़तेस, कधी मलाही रडवतेस
नयनातुन आसू मग वाहतात कसे ?
नाते दोन जीवांचे, तुझे नि माझे
दूर राहूनही अतूट राहते कसे ?

नाते आपले अतूट-अखंड रहू दे
आपल्यातील प्रेम असेच उदंड वाढू दे
दूध- साखरेसारखे आपले नाते मग घट्ट बनेल असे

नाते दोन जीवांचे, तुझे नि माझे
दूर राहूनही अतूट राहते कसे ?

No comments:

Post a Comment