Tuesday, 27 March 2012

मला तेव्हा खुप छान वाटेल

मला तेव्हा खुप छान वाटेल,
जेव्हा तुझ्या नव्या कोर्या वहीवर
तुझं नाव माझ्यासकट लिहीलेलं असेल..

मला तेव्हा खुप छान वाटेल,
जेव्हा तुझ्या मोकळ्या बोटांचा चाळा
मी तुला घातलेल्या
मंगळसुत्राशी असेल..

मला खुप छान वाटेल,
जेव्हा तुझा उल्लेख
माझ्याविना अधुरा असेल..

मला असं छान वाटताना,
तु माझ्या जवळ असशील
आणि तुझ्या ओठावर
एक हलकसं स्मित असेल..

तेव्हा मला किती किती छान वाटेल..

No comments:

Post a Comment