Wednesday, 4 January 2012

मराठा आजही वाघ आहे

मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा..
अजुनही बोथट झाली नाही धार शिवबाच्या तलवारीची,
कुणाचीही हिम्मत नाही "मराठीला" संपवण्याची,
घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला,
आणि "मराठी" शिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातील
मी मराठी माणुस
कधीच भूकेपोटी पाठीत वाकलो नाही मी
कधीच लाचारांच्या पंगतीत बसलो नाही मी
अंधार उजळण्यासाठी शब्दांच्या ज्योती झालो
अन कधीच आभासांच्या वार्याने विझलो नाही
असे नका समजू
विझलेली हि आग आहे
असे हि नका समजू
उरली फक्त राख आहे
राखेमाधुनही उभे राहणार्य
फ़िनिक्ष पक्ष्याची हि जात आहे
मराठा आजही वाघ आहे
आले शेकडो गेले शेकडो
सगळ्यांना पोहोचवायची औकात आहे
शिव शंभूंची मरून हि
हे स्वराज्य राखण्याची साद आहे
म्हणूनच लाखो करोडो मावळे येथे
महाराज्यांवर हसत हसत कुर्बान आहेत
मराठा आजही वाघ आहे
आई भवानीच्या आशीर्वादाची
प्रत्येक हृदयाला जान आहे
राजासाठी तन मन धन
सार सार कुर्बान आहे
म्हणून तर
मराठा आजही वाघ आहे
जय महाराष्ट्र

No comments:

Post a Comment