शेवटी नशीब...............!! ती म्हणायची, चल लांब क्षितीजापर्यंत फिरायला जाउ, मी जायचो ती म्हणायची, नदीत पाय सोडून शेजारी बसू, मी बसायचो हळूहळू ती सांगेल ते सगळं मी ऐकायला लागलो एवढच काय, ती विसरली तर आठवण पण करायला लागलो तिच्यातलं लहान मूल मी खूप जपायचो तिचं अल्लडपण कौतुकानी न्याहाळायचो एकदा ती म्हणाली, ए आज आपण खेळूयात का? म्हटलं काय खेळूयात? लपाछपी, ती म्हणाली आता मी तिला शोधून दमलोय हाका मारल्या, सगळीकडे पाहिलं प्रत्येकाला विचारलं, अजूनही ती मला सापडलेली नाही हवं तर मी परत राज्यं घेतो, पण निदान बाहेर तरी ये लपलेल्या जागेतून.........
No comments:
Post a Comment