Friday, 17 February 2012

दारावरुनी माझ्या तीची वरात गेली

दारावरुनी माझ्या तीची वरात गेली शोकात भिजलेली ती रात्रही लुटेरी. स्वप्नासवेच होते ते, क्षण हे उदास. सोडुनि मजला एकटे सगळेच अकांत सुखात. स्वप्नातले नजारे, घेउनी ती गेली सोबतीला मात्र माझ्या, आठवणींची शिदोरी. प्रेमात बुडालेल्या त्या, रात्री होत्या निवांत. सोबती आता आहे हा, माझा विरह आणि एकांत. सोडुनी ती वचने आणि, आश्वासने खोटी, पहातो मी स्वप्न आता एकट्यानेच ती सर्व चोरटी. डोळ्यात साठलेली प्रतिमा सदैव होती तीची, नजरेसोबत फिरती, आठवण एकांताची. नकोत ती स्वप्न अन् त्या खोट्या अपेक्षा वेड्या मनास आता, तीच्या विरहाचीच नशा...

No comments:

Post a Comment