मग काय झालं आज तू माझ्यासोबत नाहीस तर
मग काय झालं आज तू माझ्यासोबत नाहीस तर...
तुझ्या आठवणी तर आहेत ना... जगेल मी त्यांच्यातच...
मग काय झालं आज तू माझ्यासोबत नाहीस तर...
तुझ्यासोबत घालवलेल्या क्षणांची साठवण तर आहे ना ... रमेल मी त्यांच्यातच...
मग काय झालं आज तू माझ्यासोबत नाहीस तर...
तुझ्या त्या ओझरत्या स्पर्शाचा आभास तर आहे ना... गुंतेल मी त्याच्यातच ...
मग काय झालं आज तू माझ्यासोबत नाहीस तर...
तुझ्या केसांचा तो ओलसर गंध तर आहे ना स्मरणात... मिसळेल मी त्यातच...
आज Valentine Day आहे...
मग काय झालं आज तू माझ्यासोबत नाहीस तर...
अगं सगळे वेडे valentine 'DAY' celebrate करतायेत ...
पण रात्रीचं चांदणं तर आहे ना...
हरवेल मी त्यांच्यातच !!!!
No comments:
Post a Comment