Friday, 17 February 2012

पहा काय जमाना आलाय?

पहा काय जमाना आलाय?

लाद्यांच्या या मुंबईत जमिनी वर माती नाहीयेय,
माणसांमध्ये राहून माणसा माणसात नाती नाहीयेय,
पहा काय जमाना आलाय?

पोराच्या मनात विचार चौपाटीवरच्या भेलचा आहे,
आणि बापाच्या मनात विचार ऑफिसच्या इ-मेलचा आहे,
पहा काय जमाना आलाय?

म्हणे प्रगतीने जग खूप जवळ आलंय,
अरे पण ज्याला स्वताचं जग मानायचो असं माणूस दूर झालय,
पहा काय जमाना आलाय?

आईचा "मम्मा आणि मॉम" झालंय
बाबांचं "पापा आणि Dad" झालंय
पहा काय जमाना आलाय?

बाजारात वटसावित्रीच्या पूजेचे पण Kit आलंय,
जात्यावरचे दळण गेले,"बेलवलकर pvt ltd"चे ready made पीठ आलंय,
पहा काय जमाना आलाय?

ताटावरल्या गप्प्पांची मजा गेलीय,
कारण बाबांना Tv वरच्या News नि आणि
आईला कपूरांच्या एकतेने घेरलंय
पहा काय जमाना आलाय?
पहा काय जमाना आलाय?

No comments:

Post a Comment