नको वाजवू श्रीहरी अशी मुरली रे....
हरवली मी तुझ्यात......मीच माझी ना उरली रे....
किती भिजली तुझ्या प्रेमात मी...
तरी तुझी प्रीती ना कधी मला पुरली रे.....
कारण ना जाणे....मी तुझ्यात कशी स्वत:स भुलली रे....
बासरीत तुझ्या मी गुंग गुंग झाली रे....
वेडात तुझ्या बेधुंद अशी झाली रे.....
तू ना साथ कधी दिलीस कान्हा....
पण कमी तुझी मज कधी ना झाली रे....
तुझ्या माझ्या नात्याला नाव कसे द्यावे...
कुठल्या नात्यात मी स्वत:सी अडकुनी घ्यावे....
ना प्रेयसी ना अर्धांगी मी तुझी रे....
तरी सगळ्यात वेगळी...सावली मी कान्हा तुझी रे....

No comments:
Post a Comment