ऐकताच सूर बासरीचे,
वेडी होऊन फिरते राधा,
जागो जागी शोडते,
पण नाही सापडत कान्हा तिझा...
अडखळते, धडपडते,
स्वताशीच मग ती बडबडते,
शोधून शोधून थकते,
अन निराश होऊन, झाडा खाली बसते...
डोळे मिटून घेताच, कान्हाचे नाव,
परत ऐकू येतात, सूर तिला बासरीचे,
उघडताच डोळे...
दिसतो तिला कान्हा तिझा,
अन निराश त्या चेहऱ्यावर ,
परत एकदा हसू येते..
हरवू लागते ती स्वताला,
बासरीच्या सुरां मध्ये,
जगाच नाही भानच तिला,
अन कान्हाच्या प्रेमात,
परत राधा वेडी होते....
परत राधा वेडी होते..
No comments:
Post a Comment