तिला आठवण आली कि,तिने फक्त रिंग मारायची असते,
कमी कॉल रेट्सचे सीम कार्ड सुद्धा त्यानेच दिलेले असते
म्हणूनच म्हणतो,मुलींचं आपलं बरं असते ||धृ||
त्याला राग आला,तर तिने फक्त गालातल्या गालात हसायचे असते,
पण तिच्या रागावन्यावर तो हसला,तर "हसतोस काय मुर्खा?"अशी ओळ तयार असते.
म्हणूनच म्हणतो,मुलींचं आपलं बरं असते ||१||
त्याला उशीर झाला तर,त्याच्यासाठी तक्रारींची लिस्ट तयार असते,
आणि तिला उशीर झाला तर,दमुन आली असेल बिचारी म्हणून त्याने तिची bag धरलेली असते
म्हणूनच म्हणतो,मुलींचं आपलं बरं असते ||२||
तिच्या अगदी आळस देण्याच्या सवयीला पण त्याची "वाह वाह" असते,
तो सुंदर हसला तरी ,"हसू नको,बावळत दिसतोयस"अशी तिची दाद असते.
म्हणूनच म्हणतो,मुलींचं आपलं बरं असते ||३||
भेटून निघताना उशीर झाला तर "चल जाते मी.."असा तिने म्हणायचे असते
"बस गं,जाशील आरामात,सोडीन मी घरी" असे बोलून त्यानेच थांबवायचे असते
म्हणूनच म्हणतो,मुलींचं आपलं बरं असते ||४||
मुलींचं आपलं बरं असते,मुलींचं आपलं बरं असते...
No comments:
Post a Comment