Tuesday, 8 May 2012

छान होतास रे तू

Shrikrishna Patil Tasgaon

छान होतास रे तू ..... पण जमलं नाही मला
कळत होतं रे तुझं प्रेम पण ... माझंचुकलं र
जरा ,
असा नको विचार करूस कि मी विसरलेय
तुला ,
मनात खोल कुठेतरी आठवणीमध्ये साठवलंय
...
तुला

आठवते मलाही आपले ते स्वप्नांचे घर ,
तुझ्या खांद्यावरून
पाहिलेली तीपावसाची सर ,
वेळोवेळी तू दिलेली ...
माझ्या हक्काची साथ ,

अनवाणी वाळूत
चालताना माझा धरलेला हात .
हातावर रंग ठेवून .... उडाले पाखरू,
पण तू असं जगणं नको सोडूस ,
स्वप्न बघ .... तू... नवीन
तुटलाय आपल्या घराचा वासा ,

आता पुन्हा नको जोडूस
भेटली ना मी कधी तर ..
पाहून मला रडू नको वेड्या ,
कसंबसं सावरलंय मी स्वतःला ,
आता पुन्हा बांधू नको बेड्या....

आताही तुझी आसवं मला नाही बघवणार,
तुझे भिजलेले डोळे मला नाही पहावणार .
धावत येईन मी तुला सावरायला ...
स्वतःच्या प्रेमाला रडताना पाहून
स्वतःला कसं आवरणार ?

व्हायचं असेल तर ... सगळं होईल रे ठिक ,
पण वाट नको पाहूस ...
माझ्याशिवाय चालायला शिक .... !!!!!

No comments:

Post a Comment