Tuesday, 22 May 2012


वेडं मन हे असं का वागतं..
वेडं मन हे असं का वागतं..
कधी उगाच स्वैर विहारतं…
कधी गुपचुप कोपर्‍यात रुसुन बसतं….


कधी छोट्याश्या गोष्टीनेही खुप आनंदतं…
कधी मोठ्या दुखा:तही स्थितप्रज्ञ राहतं…


कधी आनंदाच्या सरींची बरसात करतं…
कधी व्यथेच्या सागरातही आनंदानं एकटच डुलतं…


कधी हवं ते मिळावं म्हणुन टाहो फ़ोडतं..
कधी मिळवता न आल्यामुळे उगाच झुरतं…


कधी आठवणींसोबत भविष्याचं चित्र रंगवतं
कधी काही कटू आठवणी आठवून उगाच रडतं….


कधी मन माझं उधाणलेली लाट
कधी मन अनोळखी भविष्याकडे नेणारी सुंदर वाट


कधी मन वादळ वारा आपल्याच कैफात वाहणारा
कधी मन माझं… आसवांचा पाउस कोसळणारा


एक कोडं वाटे मन अगदी गहीरं गहीरं
कधी सारं काही ऎकूनही वागे बहीरं बहीरं


असं गं कसं मन माझं मलाच समजेना…
मन कोणाच्या गं सारखं हे गुज उमजेना

No comments:

Post a Comment