Tuesday, 27 March 2012

मला तेव्हा खुप छान वाटेल

मला तेव्हा खुप छान वाटेल,
जेव्हा तुझ्या नव्या कोर्या वहीवर
तुझं नाव माझ्यासकट लिहीलेलं असेल..

मला तेव्हा खुप छान वाटेल,
जेव्हा तुझ्या मोकळ्या बोटांचा चाळा
मी तुला घातलेल्या
मंगळसुत्राशी असेल..

मला खुप छान वाटेल,
जेव्हा तुझा उल्लेख
माझ्याविना अधुरा असेल..

मला असं छान वाटताना,
तु माझ्या जवळ असशील
आणि तुझ्या ओठावर
एक हलकसं स्मित असेल..

तेव्हा मला किती किती छान वाटेल..

Monday, 26 March 2012

जाताना एकदा तरी नजर वळवून जा, इतरांना नाही निदान मला कळवून जा, मन हि अशीच जुळत नसतात, हि मनाची कळी एकदा फुलवून जा, प्रेम केलय काही नाटक नाही, सगळे हिशेब प्रेमाचे एकदा जुळवून जा, इतरांना नाही निदान मला कळवून जा, जाताना एकदा तरी नजर वळवून जा...

Friday, 23 March 2012

पहीला दिवस कॉलेजचा,


पहीला दिवस कॉलेजचा,
खुप खुप मजा केली,
एकटेपणाची सवय माझी
हळू हळू विरून गेली..


माझ्याच बसमधे,
माझ्याच वर्गात,
जणू आम्ही दोघे,
नव्या मैत्रीच्या शोधात..


मैत्रीसाठी माझा प्रस्ताव,
माझ्या विनंतीला तीचा होकार,
तेव्हा जाणवले आता मैत्रीच्या झाडाला,
नवी पालवी फुटणार..


मैत्री आमची खुप सुंदर,
एकाकीच्या सागरात जिव्हाळ्याच बंदर,
ती म्हणायची राहूया आपण,
असंच सोबती निरंतर…


तीचा माझ्यावर खुप जिव,
हे तिच्या स्वभावातून कळायचं,
माझ्या अपयशाला,माझ्या चुकीला,
तिच्या डोळ्यातून टीप गळायचं..


ती मला सावरायची ,
माझ्या उदासीला दुर लावायची,
आंनदाची ती श्रावणसर ,
माझ्यावर वेळोवेळी कोसळायची..


मैत्री आमची वाढत गेली,
तसं एकतर्फी प्रेम माझ्यात जागं झालं,
पण मैत्रीला काही होणार नाही ना?
असं भितीच वारं माझ्या मनात आलं


अस्वथ व्हायला लागलो,
दिवसे न दिवस विचार करू लागलो,
तिला कसंतरी कळावं म्हणून,
उगाच प्रयत्न करू लागलो…


कॉलेजच्या शेवटच्या दिवशी,
मी तिला माझ्या मनातलं सांगितलं,
खरतरं आमच्या या नितळ मैत्रीला,
मी तेव्हाच दुर लोटलं

मनात असतो विचारांचा काहूर


मनात असतो विचारांचा काहूर
तरी शब्दा येत नाहीत ओठांवर
खूप काही सांगायचा असत
तेव्हा नसत कोणीही आपल्यासमोर

किती वेळा वाटत की आता
सोडून द्यावेत हे पाश मायेचे
पण नाही सुटत ते रेशमी बंध
आपल्याच नात्यातील कर्तव्याचे

रक्ताची नाती तर
"रेडीमेड" मिळतात
आणि बाकीची म्हणे
"कस्टमाइज़्ड" असतात

तरी "इट्स माइ चाय्स" हा
असतो निव्वळ एक भास
सगळा आधीच असत
"त्यानी" ठरवलेल खास

त्यातूनच मग जुळतात का
काहींचे सूर अनॉखे
आणि त्यालाच म्हणायचे का
आपण मैत्रीचे नाते?

आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे




इन्द्र्धनुष्याचे रंग आहेत आणि पारिजातकाचा वास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे


मी म्हणजे जीवन आणि तु म्हणजे श्वास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे


संकटांची नाही भिती, तुझ्या मैत्रीचा विश्वास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे


कधी वाटते फक्त तुझी मैत्री सच्ची, बाकी दुनिया नुसता आभास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे


हवे काय अजुनि त्याला, मित्र तुझ्यासम ज्यास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे


ओढ तुझ्या सावलीची माझिया रस्त्यास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे


असो वा नसो कुणी आपल्या संगे, पर्वा त्याची कुणास आहे
आपल्या मैत्रीमध्ये मित्रा बरेच काही खास आहे


माझ्या चुकांवरही मित्रा पांघरूण तुझे हमखास आहे
आपल्या मैत्रीमध्ये मित्रा बरेच काही खास आहे


तुझ्याबरोबर ऐन उन्हाळा ही मजला मधुमास आहे
आपल्या मैत्रीमध्ये मित्रा बरेच काही खास आहे


आयुष्याच्या पटलावरती तुझ्या मैत्रीची आरास आहे
आपल्या मैत्रीमध्ये मित्रा बरेच काही खास आहे


आपल्यात कधी निखळ चर्चा, आणि कधितरी उपहास आहे
आपल्या मैत्रीमध्ये मित्रा बरेच काही खास आहे

मैत्रीमधले अश्रू


मैत्रीमधले अश्रू"
असते मतलबी, दुनिया ही सारी,
पण आपले, निराळे, असतातही काही,
दैव ज्यांची, सतत परिक्षा पाही,
मैत्रीमधल्या अश्रुंची, किंम्मत असते न्यारी


जिथे असते श्रद्धा आणि भक्ति,
असे पुजनिय, असतात काही व्यक्ति,
क्षणिक असते, अबोल्याची सक्ति,
मैत्रीमधल्या अश्रुंची, किंम्मत असते न्यारी


गौण ठरतात मैत्रीपुढे, रक्ताची नाती,
कारन ही असते, सुंदर, निर्मळ नाती,
मनास होत नाही, कधी येथे क्षिती,
मैत्रीमधल्या अश्रुंची, किंम्मत असते न्यारी


इथे शब्द असतात काही, जे लागतात जिव्हारी,
विसर पडतो यांचा, इथे माणसं आपलीच सारी,
आठवणींन्ने त्यांच्या, मनास येते नवी ऊभारी,
मैत्रीमधल्या अश्रुंची, किंम्मत असते न्यारी...

सगळ्यांन साठी मी आहे,


पण ??


माझ्यासाठी कुणीचं
नाही..


सगळे मला सगळं काही सांगतात,


पण ??


माझं ऐकणार असं कुणीचं नाही..


सगळ्यांच्या अडचणीत धावणारा मी,


पण ??


माझ्या अडचणीत,
मला हात देणारा असं कुणीचं नाही..


मित्र म्हणून असणारे असे खूप आहेत,


पण ??


मैत्री निभावणारा असं कुणीच नाही..


ती गेल्यावर..


रोज रडतो मी आता,


पण ??


माझे डोळे पुसणार असं
कुणीचं नाही..


माझ्यासाठी ती, अजूनही माझं विश्व आहे,


पण ??


तीच्यासाठी, आता मी कुणीचं नाही..


आता मी खूप एकटा आहे,


अन् माझ्या शिवाय, मला आता कुणीचं
नाही..


अन् माझ्या शिवाय, मला आता कुणीचं
नाही.. 

Thursday, 22 March 2012

> "काय आयटम चाललीय बघ....जर कोणी म्हटले?"
> "तर लगेच म्हणणार : वहीनी आहे तुझी साल्या, दुसरीकडे बघ!"

> हजार पोरी बघून पण यांचे मन काही भरत नसतं.
> पण काहीही म्हणा, साले हे मित्र असतात बाकी मस्त!

> "नडला कि फोडला" असे ह्यांचे ब्रीदवाक्य असतं!
> पण काहीही म्हणा, साले हे मित्र असतात बाकी मस्त!

> पास झाल्यावर पार्टीचे निमंत्रण त्यांना द्यायचं नसतं!
> निर्लज्ज असतात ते, त्यांनी ते आधीच ग्राह्य धरलं असतं!
> पण काहीही म्हणा, साले हे मित्र असतात बाकी मस्त!

> शाळेचा result असो या प्रेमाचा, ह्यांचाच धिंगाणा जास्त!
> तुमचे प्रेमप्रकरण अख्या कॉलेजमध्ये ह्यांच्यामुळेच गाजतं!
> पण काहीही म्हणा, साले हे मित्र असतात बाकी मस्त!

> प्रत्तेक दु:खात त्याचं तुम्हाला पाठबळ असतं!
> उन्हात उभे तुम्ही,तरी ह्यांच्याच पायाला भाजतं!
> पण काहीही म्हणा, साले हे मित्र असतात बाकी मस्त!

> शेवटच्या बेन्चवरच्या कमेंटला दाद देणे हे त्यांच्या हक्काचं काम असतं!
> Break-up नंतर "अशाच असतात रे पोरी......"हे ठरलेले वाक्य असतं,
> पण काहीही म्हणा, साले हे मित्र असतात बाकी मस्त!

> प्रेमाचे नाही वाजले तरी मैत्रीच नाणं नक्की वाजतं,
> तोंडावर नाही केली स्तुती त्यांनी तरी,
> दुसर्यासमोर त्यांच्या तोंडून तुमचच नाव गाजतं!
> पण काहीही म्हणा, साले हे मित्र असतात बाकी मस्त!

> मित्रांनो,जीवाला जीव देणारे मित्र खूप नशिबाने भेटतात,
> खरे मित्र ओळखा आणि आयुष्यभर त्यांची मैत्री जपून ठेवा! 

एकदा ती बसमध्ये अचानक दिसली


एकदा ती बसमध्ये अचानक दिसली
मित्राने ओळख करून दिली
मी विचारले , कोणत्या शाळेतली गं तू?
तुझ्याच शाळेतली , बघितलं नाही कधी मला तू?

काय सांगणार आता हिला
एकदा वर्गातल्या मुलीला हाच प्रश्न विचारला
चिडली होती जरा, "तू मुलींकडे कधी बघतच नाहीस"
काय करणार, तेव्हढी हिंमतच झाली नाही

हा, तर ती बस मधली मुलगी
आताही माझ्याच कॉलेजात होती
सुंदर ती होती, वाणीही मंजुळ होती
राज की बात, मला ती आवडली होती.

मग काय माझा बसस्टॉपला जायचा टाइम बदलला
वाट पाहण्यात एक-दोन बसही चुकू लागल्या
दूरून दिसताच ती, गोड गुदगुल्या होऊ लागल्या
देवकृपा, असा योगायोग वारंवार घडू लागला

बघता बघता दोन वर्षे अशीच सरली
तरीही स्टॉपपुढे माझी मजल नाही गेली
कॉलेज संपले, दोघांच्या वाटा वेगळ्या झाल्या
कोमल हृदयात माझ्या, हाय! , आठवणी मात्र राहिल्या

जेथे बसून मी खूप काही स्वप्ने रंगवली होती
तो स्टॉप आता खाली खाली वाटत होता
गेला उन्हाळा , गेला पावसाळा , हिवाळा ही गेला
तिच्या दर्शनासाठी हा मन्या पार तरसून गेला

पुन्हा योगायोग, त्याच बसस्टॉपवर ती अचानक दिसली
हसलो मी, सुखावलो मी आणि पुन्हा तिच गुदगुली
नजरा नजर होताच मोठ्या खुशीत मी विचारले
काय! खूप दिवसांनी भेट झाली ना आपली!!

तिच्या त्या प्रश्नार्थक नजरा, गोंधळलेला चेहरा
काय झालं ! असा कोणता बॉम्बं मी टाकला
विचार केला तिने, त्याच मंजुळ वाणीत ती वदली
"माफी, चेहरा ओळखीचा वाटतो, पण नाव काय आपलं?"

क्षणात कोसळलो आकाशातून खाली, आई गं!!
चांदणे चमकले, थोडी भोवळही आली
लाचार उभा मी, माझ्यावरच ही वेळ का आली
नाव सांगितलं मी, "बघ आठवतं का काही"

हसली जरा ती, कदाचित चूक तिला कळली
पण लगेचच पुढच्या बसने "टाटा" म्हणून निघून गेली
बसच्या घंटीने माझी सारी स्वप्ने मोडली
अशी ती मुलगी माझी फजिती करून गेली

साधा भोळा मी, बिचारा, तुटलो होतो जरा मी
पण सावरलोय मी, ठरवलं आहे पक्कं मी
कानाला खडा, कोणासाठी अधीर इतका होणार नाही मी
झालोच तर, बसस्टॉपवर वाट मुळीच पाहणार नाही मी.....

Wednesday, 21 March 2012

काळ्याभोर मेघांची नभात दाटी असावी

काळ्याभोर मेघांची नभात दाटी असावी
 
तुझ्या डोळ्यात मी भिजावे अन् तू माझ्या नसानसात भिनावी
गडगडते ढग तुटून एकच सर अशी बरसावी
 
त्यांनी माझ्या मनाची दशकांची तहान शांतवावी
माझ्या देहाच्या वृक्षावरील अवघी पाने चिंब होऊन ओघळावी
 
त्याच वृक्षाला लिपटलेल्या लाजाळूप्रमाणे तू मोहरून मिटावी
कृष्णरंगी मेघांमागून सूर्याने सप्तरंगी किरणांची जाळी पसरवावी
 
सांजेमागून येणारी अवनीही त्यावर लुब्ध होऊन थबकावी
आता जरा पाऊस रिमझिम व्हावा अन् कडाडती विजही थकावी
 
तुझे हात माझ्या हातात असावे अन् नजरेत नजर गुंतावी
रिमझिम झालेल्या पावसात चिंब होऊन तू गोडगोड व्हावी
 
माझ्या उबदार मिठीत येताच हलके हलके विरघळावी
झरझरणार्‍या घनांच्या छिडकाव्याने अवघ्या रानातील माती ओलावी
 
तशीच डबडबलेली तुझी देहकुपी माझ्या हृदयात अलगद लवंडावी

एक असंही प्रेम होतं दोन फुलपाखरे प्रेमात पडली होती

एक असंही प्रेम होतं दोन फुलपाखरे प्रेमात पडली होती . . .
एके दिवशी ते लपा-छपी खेळत होते , खेळताना मुलगा फुलपाखरू : चल एक छोटासा नवीन खेळ आपल्या दोघांच्यात . . .
मुलगी फुलपाखरू : हो चालेल . . .
मुलगा फुलपाखरू : आपल्या दोघांध्ये ,सकाळी सकाळी ह्या समोरच्या फुलाजवळ जो सर्वात प्रथम बसलेला असेल , तो , दुसय्या पेक्षा जास्त प्रेम करतो . . .
मुलगी फुलपाखरू : हो चालेल !!
दुसय्ऱ्‍या दिवशी सकाळी सकाळी मुलगा फुलपाखरू त्या फुलाच्या जवळ येऊन उभा राहिला , आणि ते फुल उमलण्याची वाट पाहू लागला . . .
जेणेकरुन तो तिच्या आधी त्या फुलामध्ये बसेल आणि तिला दाखवून देईल कि , त्याचे तिच्यावर खूप खूप प्रेम आहे . . .थोड्याच वेळात फुल उमलले . . . पाहतो तर काय ???
ती मुलगी फुलपाखरू त्या उमलेल्या फुलामध्या मरून पडली होती . . . . .कारण , राञभर ती त्या फुला मध्येच राहिली होती , फक्त ह्या वेड्या अपेक्षेने कि सकाळ होताच आणि ते फुल उमलताच ती त्या मुलगा फुलपाखरू कडे आनंदाने झेप घेईल आणि , त्याला दाखवून देईल कि ती त्याच्यावर जीवापाड प्रेम करते ते

ही पोस्ट करण्या मागचा हेतू एवढाच की आश्या जीवघेण्या स्पर्धेला बळी पडून आपले निरागस जीव न गमावता आपले प्रेम सध्या सरळ मार्गानेच पटवून द्या . . त्यातच प्रेमाचा गोडवा आणि दोघांचे सुख सामावलेले आहे. 
 

दुखः एका प्रेयसीचे ....

दुखः एका प्रेयसीचे ....

कुणीतरी विचारले तिला..., " तो " कुठे आहे....??

हसत उत्तर दिले तिने ....

माझ्या श्वासात...,
माझ्या हृदयात...,
माझ्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्यात तो आणि फक्त तोच आहे....

यावर पुन्हा विचारले गेले मग..., " तो " कुठे नाही......??

तिच्या ओल्या डोळ्यांनीच तिचे उत्तर दिले...

" माझ्या नशिबात आणि माझ्या आयुष्यात...." ♥♥♥
 
असेच कधीतरी
मध्यरात्री डोळे उघडे ठेउन झोपत असताना
असाच मी चांदन्याशी तुझ्याबद्दल बोलायचो ,
' तू जरा जास्तच करतोस '!
असे एखादी चांदनी बोलणार
असेच कधीतरी तुला विसरताना,तू मला आठवणार।
असेच कधीतरी कोणत्या वेळी ठाउक नाही ,
कोणत्यातरी वळनावर ,
तू मला दिसणार ,
तू मला चोरून ,तर मी तुला मनभरून बघणार ,
तेव्हा परत एकदा मी तुला माझ्या आठवणीत साठवणार... ♥
 
प्रेमाचा नाद करायचाय .......

प्रेम म्हणजे काय असते....
भूक - तहान विसरणे ......
आणि त्यात तल्लीन होणें.....
... यालाच प्रेम म्हणतात का.

प्रेम म्हणजे काय असते.....
वेदना सहन कराव्यात ......
आणि क्षणोक्षण आठवणे....
यालाच प्रेम म्हणतात का.

प्रेम म्हणजे काय असते......
आपणच आपल्यात असतो.....
आणि फक्त प्रेमाच्या आठवणी....
यालाच प्रेम म्हणतात का.

प्रेम म्हणजे काय असते......
एक पवित्र मिलन असते......
आणि त्यालाच जपून असावे.....
यालाच प्रेम म्हणतात का.

प्रेम म्हणजे काय असते........
दोघांना एकमेकांचा सहवास......
आणि गुंतून जाण्यात .......
यालाच प्रेम म्हणतात का.

प्रेम म्हणजे काय असते......
त्यात प्रेमी - युगुल असतात .....
आणि एकमेकांना सांभाळतात ......
यालाच प्रेम म्हणतात का.
 

काल एकटीच समुद्रकिनारी फिरता असताना

काल एकटीच समुद्रकिनारी फिरता असताना
मी तुझे नाव त्या रेतीवर लिहिले .. माझ्या नावासमोर ..
आणि स्तब्ध होऊन बघतच राहिले.....!!!

मस्त सूर्याची सोनेरी किरणे पडली होती त्यावर ..
मधूनच उसळून एक लाट आलीच ..
पण नाहीच पुसू दिलं ते नाव .....!!

थोडावेळ राहू दिलं ..आणि
नंतर हलक्या हाताने मीच पुसून टाकलं ...
स्वतःपुरतेच मानसिक समाधान ..
आणि आनंद घेतला .....!

एकटीच होते त्यावेळी समुद्रकिनारी ...
सगळीकडे शांतता ..
पण ..मावळता सूर्य ..
उसळणाऱ्या लाटा ..
आणि पडलेले शंख शिंपले....
आणि मऊ आणि थंडगार रेती ला मात्र
हे प्रकरण ठाऊक झाले खरे
त्यांचे एक बरे होते....
निमूटपणॆ पाहत होते बिचारे
खुप आधार वाटला या सर्वांचा
वाटले आपण व्यक्त झालो कोणासमोर तरी...!

एकदम हवेत तरंगत होते त्या रात्री ..
घरी येऊन romantic गाणी ऐकली ...
किती उकळ्या फुटत होत्या म्हणून सांगू...?
त्या रात्री ....

एक पत्र लिहिलं तुला.... एकांतात..
झोपच नाही लागली त्या रात्री ....!!!
अजूनही तसंच आहे ते पत्र ..
वाचते अधूनमधून तुझ्या आठवणीत ..

पण आता ते जीर्ण झालाय वाचून वाचून ..
अगदी तुझ्या-माझ्या सारखं नात्यासारखच ....!!!

सर्व काही अजूनही आठवतंय ..
अगदी काल घडून गेल्या सारखं ..
पण...तुला आठवायचे काहीच कारण नाही ...
कारण यातले तर तुला काही ठाऊक च नाही ....!! ♥♥♥
 

आज पुन्हा जगण्याचं वेड आहे



आज पुन्हा
जगण्याचं वेड आहे
आज पुन्हा
लढण्याचं बळ आहे
नको जाऊ
मध्येच सोडुन
तुझ्याशिवाय अधुरा
माझा खेळ आहे..
मांड एक डाव
आज पुन्हा
लपंडाव नको
होऊ देऊ
तुजवर विश्वास आहे
घर कि अंगण
तुझे न माझे
हा संसार सगळा
आपला एक मेळ आहे......... ♥♥♥

अशी असावी माझी प्रेयसी

अशी असावी माझी प्रेयसी.....................

प्रेमाला प्रेम समजणारी ती प्रेयसी असावी
मी जसा आहे तसेच, माझ्यावर प्रेम करणारी असावी

... खुबसुरत नसली तरी,
चारचौघीत उठून दिसणारी असावी

शेर -ए-गझल नसली तरी,
माझी एक छानशी चारोळी असावी

बागेतल्या फुलांसारखी सुंदर नसली तरी,
पण अंगणातल्या तुळसेसारखी पवित्र असावी

हाय... हेलो... नया दौर असला तरी
नव्या जुन्याची सांगड घालणारी असावी

पण मनाने सुंदर असावी
नात्यांच्या नाजुक धाग्यांना हळुवार जपणारी असावी......
मी जसा आहे तसेच, माझ्यावर प्रेम करणारी असावी.
 

मी तुझी आजूनही वाट पाहतो

. ♥´¸.♥*´¨) ¸.♥*¨
•ღ•मी तुझी आजूनही वाट पाहतोय..●•٠ღ
तिला मी पहेल्यांदा पाहिले....
आणि पाहतच राहिलो ,.....,
तिला बोलयला घाबरायचो...
तिला बोलायचा खूप प्रयत्न केला..
पण माझा प्रतेयक यशस्वी ठरला नाही..
मनाच्या एखाद्या कोपऱ्याततीच होती...
एके दिवशी तीच बोलली.....
.
न घाबरता.....
हे बग मी तुझ्यावर प्रेम करत नाही...
तुला माझ्या पेक्षाही छान मुलगी मीळेल...
.
मी तिला लगेच बोललो...
मी याला श्राप समजू कि दिलासा...
तुझ्या विना जगू शकत नाही..
का मला तुझ्या विना जगण्याची शपथ..
दिली..
जिवंत राहुनही मी प्रतेयक श्वासात मरतोय..
आणि मी तुझी आजूनही वाट पाहतोय..........
♥ ♥
. ♥´¸.♥*´¨) ¸.♥*¨
 

आठवण काढू नको म्हणालास

आठवण काढू नको म्हणालास
तरी ते शक्य आहे का?

तुझ्या पासून वेगळं होवून
माझ्या जीवनाला काही अर्थ आहे का....???

तुझ्या इतक समजून घेणारा मला
दुसरा कोणी मिळेल का..???

आणि जरी मिळाला
तरी तुझ्या डोळ्यातलं प्रेम
मी त्याच्या मध्ये शोधू शकेल का....??

तुझ्या मध्ये मिळणारा आधार
तुझी माझ्यासाठी असलेली काळजी
ह्या गोष्टी मला दुसर्या मध्ये नाही सापडणार

कारण .., तू तो आहेस ज्याच्यासाठी मी जगतेय
आणि तू म्हणतोस आठवण काढू नकोस......
तुझी आठवण न काढता माझ्या जगण्याला तरी काही अर्थ असेल का.....?.. ♥♥♥
 

तिने कित्ती सुंदर दिसावं


तिने कित्ती सुंदर दिसावं..
जसं गुलाबाचं फूल उमलावं..
कोणाच्याही नजरेत भरावं..
तासन तास पाहत रहावं..!!!!

तिने कित्ती गोड बोलावं..
ऐकणाऱ्याने विरघळून जावं..
हरवूनच जावं ..
सोबत तिच्या..!!!!

तिने कित्ती साधं रहावं ..
त्यातही रूप तिचं खुलावं..
कोणीही फिदा व्हाव ..
अदांवर तिच्या..!!!!

तिचं उदास होणं..
कसं हृदयाला भिडावं..
कोणालाही वाईट वाटावं..
अश्रूंनी तिच्या..!!!!

तिचं हसणं ..
कोणालाही सुखवावं..
कोणीही घसरून पडावं..
गालावरल्या खळीत तिच्या..!!!!

तिच्या नजरेने मलाच शोधावं..
अचानक नजरेने नजरेला भिडावं ..
मग तिने लगेच दुसरीकडे पहावं..
लाजेने चूर चूर व्हावं..!!!!

ती समोर असताना ...
मी सारं काही विसरावं..
तिने इश्य करत लाजावं..
मी 'हाय हाय' करत घायाळ व्हावं ..!!!!

तिने फक्त माझंच रहावं..
मीही फक्त तिच्यासाठीच जगावं..
साथ देऊ जन्मोजन्मी ..
विरहाचं दुख कधीही न यावं..
कधीही न अनुभवावं..!!!!

तु आहे म्हणुन तर..


तु आहे म्हणुन तर...
सगळं काही माझं आज आहे
हे जग जरी नसलं तरी
तुच माझ्या प्रेमाचा ताज आहे.....

मोगरा फुलला होता कालही आजही
पण त्याचा गंध कळला तुझ्याचमुळे
रंग बिघडले असते माझ्या जिवनाचे
तु आहे म्हणुन तर...
प्रत्येक रंगाचा वेगळा बाज आहे

हरवतो स्वत:ला क्षणोक्षणी
तुला शोधण्यासाठी...
पण तु नाही सापडत
तेव्हा कळते मला खरचं
तु आहे म्हणुन तर...
मनात लपलेला एक राज आहे....
  

Saturday, 10 March 2012

एक होता चिमना आणि एक होती चिमणी

एक होता चिमना आणि एक होती चिमणी
चिमना मोठा रुबाबदार आणि चिमणी अगदीच सुमार
तरीही एकमेकांचे जिवलग यार.

वेळात वेळ काढून एकमेकांशी बोलायचे,
एकमेकांना चिडवायचे आणि खूप खूप हसायचे .

चिमणीच्या मनात एक खुलत होते गुपित,
चिमण्या बद्दलचे प्रेम तिच्या मनाच्या कुपीत

रोज रोज कारे देवाकडे प्रार्थना ,
त्याच्याही मनात असू देत अशाच काहीशा भावना

एक दिवस धीर करून तिने सगळे सांगितले
पण तिला त्याने अगदी सहज नाकारले

त्याला म्हणे असे काहीच वाटत नव्हते,
त्याच्या डोळ्यात प्रेम आहे हे अगदी झूठ होते

का “नाही” ह्याची बरीच कारणे सांगितली
पण चिमणीच्या मनाला ती अजिबात नाही पटली

चिमणी तशीच घरी गेली, तिकडे जाऊन खूप रडली
काय करावे कळेना,रडू तिच्याने आवरेना

चिमणीला एक उपाय सुचला , तिने चीमन्याशी अबोला धरला
चिमण्याला मात्र ह्याचा सुधा काहीच फरक नाही पडला

चिमना अगदीच खुशीत होता , नवीन स्वप्ने पाहत होता
कदाचित तो थोडा जास्तच प्रक्टीकॅल होता

चिमणीने सुद्धा आता हसत जगायचे ठरवले
पण एकांतातले अश्रू तिला कधीच नाही आवरले

एकतर्फी असले तरी चिमणीचे चीमन्यावर अगदी खरे प्रेम होते
पण कदाचित खरे प्रेम चिमण्याच्या नशिबी नव्हते

एक प्रश्न मात्र तिला आयुष्यभर सतावत राहिला
चिमण्याच्या डोळ्यात तिला दिसलेले प्रेम हा नुसता "आभास" कसा ठरला?

पोरी महागात पडतात

पोरी महागात पडतात
खरच सांगतो पोरंनो,पोरी महागात पडतात
तुम्हाला काय,मला काय
सर्वांनाच पोरी आवडतात
जास्त जवळ जाऊ नका
कनाखाली ओढतात
खरच सांगतो पोरंनो,..............

आज हा उदया तो
रोज नवा शोधतात
नुस्तच ठेउन वासावर
खीसा मात्र कापातात
खरच सांगतो पोरंनो,................

हा नडतो,तो भांडतो
दहा जन हनतात
पोरगी राहते बाजूला
पोरच भांडनात पडतात
खरच सांगतो पोरांनो,....................

कधी इकडे,कधी तिकडे
नुस्तच चोरून बघतात
आणि आपण लागलो मागे की
सॉरी म्हणुन जातात
खरच सांगतो पोरांनो,....................

याला फीरव,त्याला फीरव
दहा लपडयात अडक्तात
कधी धुन्दित,कधी मंदित
नको तस लूडकवतात
खरच सांगतो पोरांनो,...................

कधी सेंट,कधी लिपस्टिक
नुस्तच पावडर थापतात
अन आपण मरला डोळा की
बापाला जाउन सांगतात
खरच सांगतो पोरांनो,....................

कधी सिनेमा,कधी नाटक
नुस्ताच खीसा बघतात
अन खीसा खाली झाला की
दूसरा बकरा शोधतात
खरच सांगतो पोरांनो,पोरी महागात पडतात पोरी महागात पडतात!!
पोरी महागात पडतात
खरच सांगतो पोरंनो,पोरी महागात पडतात
तुम्हाला काय,मला काय
सर्वांनाच
पोरी महागात पडतात
खरच सांगतो पोरंनो,पोरी महागात पडतात

गोष्ट अशी एका भेटीची ..

..


तिची अन् माझी अशी अचानकच पडली गाठ
दर्शनी पाहता तिला माझी लागली पुरती वाट
हृदयाचे ठोके जसे ढोल वाजत होते
लटपट लटपट पाय तालावर नाचत होते

डावी भुवई उंचावून तिने एक कटाक्ष टाकला
प्रथमदर्शी प्रेमाचा मिळाला मला दाखला
तिचे लुकलुकले डोळे अन् गुलाबही उमलले
प्रीतीच्या फुलांचे गंध माझ्या मनी दरवळले

क्षणभर सर्वत्र स्तब्ध निरव शांतता पसरली
नजरेने नजरेला दिलेली साद मात्र समजली
सावरून बावरून तिने परतीची वाट धरली
दोन क्षणांची साथ, पण मनात कायमची भरली

एकदा मागे वळून पहावे मनाने केला अट्टाहास
आहे हे सत्य का होतोय मज हा भास
तिची धावती पावले माझ्या रोखाने येत होती
हात पसरून मी मिठीत घेण्याची दुरी होती

मला दूर सारून ती तशीच पुढे गेली
बिलगून त्या व्यक्तीच्या गाडीवर स्वार झाली
अशाप्रकारे माझ्या मनाचा झाला होता पचका
प्रथमदर्शी प्रेमाचा बसला मनाला धसका.................!!!!

Thursday, 8 March 2012

माझी ती अशी असावी

माझी ती अशी असावी
दिसायला खूप सुंदर नसली तरी चालेल,
पण मनाने मात्र सुंदर असावी
थोडीशी modern असली तरी चालेल,
पण आपली संस्कृती पाळणारी असावी
Jeans घालणारी असली तरी चालेल,
पण Punjabi Dress आणि Saree घालायची जास्त आवड असावी
Make - up करणारी असली तरी चालेल,
पण मात्यावर टिकली, नाकात नथनी, हातात बांगड्या आणि पायात पैजण घालणारी असावी
Burger - Pizza खाणारी असली तरी चालेल,
पण घरात आम्हा सर्वांना रोज छान छान जेवण करून घालणारी असावी
Nature ने कितीही बिंदास असली तरी चालेल,
पण थोडीशी का होईना गाल्यात्ला गालात लाजणारी असावी
Office मध्ये कितीही मोठ्या पध्वीवर असली तरी चालेल,
पण घरातली सर्व नाती जपणारी असावी
आयुष्यात मी कधी कुठे डगमगलो तरी,
माझ्यावर शेवट पर्यंत विश्वास ठेवणारी असावी
आणि माझ्यावर फक्त माझ्यावर खूप प्रेम करणारी असावी

Sunday, 4 March 2012

कस कळेल मला काय तुझ्या डोळ्यात आहे...

कस कळेल मला काय तुझ्या डोळ्यात आहे...


नजरा मिळवण्या आधीच नजर चुकवतेस तु

कसे ओळखावे कोणते शब्द बंद ओठात आहे...


मी शोधतो जागा माझी सदा तुझ्या भोवताली

पण हे मात्र खर की तु माझ्या काळजात आहे...


सा-या जरी बंद वाटा माझ्या मुक्या शब्दांच्या

परी तु समजुन घे आयुष्य माझ तुझ्यात आहे...


तुला मागुही शकत नाही मी आज तुझ्यापासुन

प्रश्न कोणताच नाही सार काही तुझ्या उत्तरात आहे...


हो आज या नात्याला नाव अस कोणतच नाही

आणि कशाला हव नाव अस काय नावात आहे...


मला फ़क्‍त तु हवी आहेस आणी तुझा श्वास..

श्वासाशिवाय जगणा-या काय या देहात आहे..













मैत्री म्हणजे दोन मनानंच नाजुक बंधन
मैत्री म्हणजे मनाने मनाला केलेले वंदन

मैत्री म्हणजे अबोल शांततेत होणारा संवाद
मैत्री म्हणजे काळजाला भिडणारा निनाद

मैत्री म्हणजे एकाच्या सुखासाठी दुसऱ्याच तडफडण
मैत्री म्हणजे स्वःताहा पडत असतानाही दुसऱ्याला सावरण

मैत्री म्हणजे स्पर्श करता दिलेला आधार
मैत्री म्हणजे सहवासातुन साकार झालेला आकार

मैत्री म्हणजे वाळवंटात पाण्याचा झालेला भास
मैत्री म्हणजे शेवटच्या क्षणापर्यत घेतलेला श्वास

मैत्री म्हणजे एकाचा दुसऱ्यावर असलेला अतूट विश्वास
मैत्री म्हणजे दोघांच्याही नकळत होणारा अखंड प्रवास